बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्य तर बिघडतेच शिवाय त्वचा केसांच्या निगडीत समस्याही वाढतात (Hair and Skin Care Tips). केसांची वाढ खुंटते, शिवाय त्वचेचा पोतही खराब होतो. केस गळतात, केसात कोंडा, केसांची वाढ होतच नाही. शिवाय त्वचेवर हवा तसा ग्लो येत नाही. मुरुमांच्या डागांमुळे चेहरा निर्जीव दिसतो.
जर चेहरा आणि केसांच्या निगडीत समस्या वाढत असतील तर, त्वचारोगतज्ज्ञ डॉ.शिवंती यांनी सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा. यामुळे त्वचेचा पोत सुधारेल, मुरुमांचे डाग गायब होतील, शिवाय केसांच्या अनेक समस्याही सुटतील. स्किन आणि केसांसाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? पाहूयात(Hair and Skin care tips advised by dermatologist).
त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी?
- केस प्रत्येक जण आठवड्यातून दोनदा तरी धुतो. पण काही जण शाम्पूने केस न धुता, फक्त पाण्याने ओले करतात. यामुळे केसात कोंडा आणि केस गळणे वाढू शकते. त्यामुळे पाण्याने फक्त केस धुवू नये.
- केस ओले ठेवून झोपू नये. यामुळे केस तुटण्याचे आणि स्काल्पवर घाण जमा होण्याची समस्या निर्माण होते. कारण ओले केस कमकुवत होतात आणि लवकर तुटतात. ज्यामुळे केस गळती होते.
- केस धुतल्यानंतर हेअर सीरम लावायला विसरू नका. यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या होणार नाही.
- पिग्मेण्टेशन, मुरुमांचे डाग आणि इतर काही त्वचेच्या निगडीत समस्या हार्मोनल इम्बॅलेन्समुळे देखील होऊ शकतात. त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे.
बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट
- त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. त्वचा कोरडी राहिल्यास त्वचेच्या निगडीत समस्या वाढू शकतात. त्यामुळे पाणीही सतत पीत राहा.
- आपल्या स्किन टोननुसार त्वचेची काळजी घ्या. योग्य ब्यूटी उत्पादनांचा वापर करा. त्वचेवर शक्यतो नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा.