शाम्पू, कंडिशनर किंवा एखादं नविनच तेल असं काहीही केमिकलयुक्त केसांवर ट्राय करायचं, म्हणजे जरा भीतीच वाटते. असं वाटतं की त्यामुळे केसांचा त्रास आणखीनच वाढणार तर नाही ना.. त्यामुळे शक्य तेवढे घरगुती उपाय, काही व्यायाम, आहारातले बदल असं काही साधं- सोपं केसांवर ट्राय करण्यासाठी आपण तयार असतो. कारण हे सगळं आपल्या सवयीचं आणि नेहमीच्या वापरातलं असतं.
कधीकधी केसांच्या बाबतीत असंही होतं की केसांचं दुखणं वेगळंच असतं आणि आपण मात्र तिसराच उपाय करत बसतो. त्यामुळेच तर तुमच्या केसांची नेमकी समस्या काय हे आधी लक्षात घ्या आणि त्यावरचे उपाय जाणून घ्या. केसांची नेमकी समस्या काय आणि ती कमी करण्यासाठी आहारात कसा बदल करावा, कोणता व्यायाम करावा आणि कोणता घरगुती लेप केसांना लावावा, अशी सगळी सविस्तर माहिती इन्स्टाग्रामच्या beauty.centre या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
१. केसांची वाढ होण्यासाठी...(hair growth)
उपाय- मेथीच्या दाण्यांची पेस्ट आणि खोबरेल तेल एकत्र करून केसांना लावणे. एक ते दिड तासाने केस धुणे.
ज्यूस- आवळा सरबत रोज एक ग्लास
फळ- एक संत्री दररोज
योगा- बालासन
२. केस सिल्की होण्यासाठी (freezy hair)
उपाय- दही आणि मध यांची पेस्ट केसांना लावणे आणि एक तासाने केस धुवून टाकणे.
ज्यूस- एक ग्लास गाजराचा ज्यूस रोज पिणे
फळ- एक सफरचंद दररोज
योगा- शिर्षासन
३. केसांना फाटे फुटणे (split hairs)
उपाय- पपई आणि दही यांचा लेप केसांना लावणे आणि एक तासाने धुवून टाकणे.
ज्यूस- दररोज एक ग्लास लिंबाचे सरबत
फळ- एक पेरू दररोज
योगा- उत्तासन
४. केसांत कोंडा होणे (dandruff)
उपाय- मुलतानी माती आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावणे आणि अर्ध्या- एक तासाने केस धुणे.
ज्यूस- बीटरूट ज्यूस दररोज
फळ- दररोज एक किवी
योगा- चक्रासन