Lokmat Sakhi >Beauty > केस कंबरेपर्यंत लांब करण्यासाठी वापरा 'हे' आयुर्वेदिक तेल, काही दिवसात दिसेल कमाल!

केस कंबरेपर्यंत लांब करण्यासाठी वापरा 'हे' आयुर्वेदिक तेल, काही दिवसात दिसेल कमाल!

Ayurveda Oil OF Hair Growth : या आयुर्वेदिक तेलांच्या मदतीने केस लांब होतात. चला जाणून घेऊ केस वाढवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक तेल फायदेशीर ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 10:30 AM2024-12-12T10:30:52+5:302024-12-12T10:31:47+5:30

Ayurveda Oil OF Hair Growth : या आयुर्वेदिक तेलांच्या मदतीने केस लांब होतात. चला जाणून घेऊ केस वाढवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक तेल फायदेशीर ठरतात.

Hair Care : Ayurveda Oil for Hair Growth and stop Hair fall | केस कंबरेपर्यंत लांब करण्यासाठी वापरा 'हे' आयुर्वेदिक तेल, काही दिवसात दिसेल कमाल!

केस कंबरेपर्यंत लांब करण्यासाठी वापरा 'हे' आयुर्वेदिक तेल, काही दिवसात दिसेल कमाल!

Ayurveda Oil OF Hair Growth : लांब, चमकदार केस महिलांच्या सुंदरतेत आणखी भर घालतात. याच कारणाने प्रत्येक महिलांची ईच्छा असते की, त्यांचे केस लांब, चमकदार आणि दाट असावेत. केस लांब करण्यासाठी महिला नेहमीच वेगवेगळे उपाय करतात. अनेक घरगुती उपाय देखील केले जातात. आयुर्वेदात केस लांब, दाट, मजबूत करण्यासाठी काही तेलांबाबत सांगण्यात आलं आहे. या तेलांची मोठी खासियत म्हणजे या तेलांचे साइड इफेक्ट्स काहीच नसतात. या तेलांच्या मदतीने केस लांब होतात. चला जाणून घेऊ केस वाढवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक तेल फायदेशीर ठरतात.

भृंगराज तेल

जडीबुटींचा राज म्हटल्या जाणाऱ्या भृंगराज तेलाने डोक्याच्या त्वचेमधील ब्लड सर्कुलेशन अधिक चांगलं होण्यास मदत मिळते. ज्यामुळे केसांची वाढही अधिक वेगाने होते. त्याशिवाय या तेलाच्या वापराने केसांसंबंधी समस्या जसे की, कोंडा, केसगळती, केस रखरखती होणे दूर होतात. अधिक जास्त फायदा मिळवण्यासाठी भृंगराज तेलामध्ये तिळाचं तेल मिक्स करून लावा. दोन्ही तेलांच्या मिश्रणाने आठवड्यातून एक दिवस डोक्याच्या त्वचेची मालिश करा. 

आवळा तेल 

आवळा केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातं. भरपूर व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असलेल्या आवळ्याने केस मजबूत होतात. तसेच केसांची वाढही वेगाने होते. केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी आवळा तेल सगळ्यात फायदेशीर मानलं जातं. आवळ्याचं तेल खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावल्यास अधिक फायदा मिळेल.

ब्राम्ही तेल

ब्राम्ही तेलाने डोक्याच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. या तेलाने डोक्याची मालिश केल्याने स्ट्रेस कमी होतो आणि ब्लड सर्कुलेशन चांगल्या प्रकारे होतं. ज्यामुळे केसगळती रोखली जाते आणि केस तुटणंही बंद होतं. हे तेल हलकं गरम करून वापरावं. ब्राम्ही तेल आणखी फायदेशीर करण्यासाठी भृंगराज पावडर, आवळा पावडरसोबत मिक्स करून वापरू शकता.

मेहंदीचं तेल

मेहंदी केसांसाठी नॅचरल डायसारखं काम करते. तसेच केसांची वाढ वेगाने होण्यासाठीही हे तेल फायदेशीर ठरतं. मेहंदीच्या तेलाच्या वापराने डोक्याच्या त्वचेमध्ये नॅचरल ऑइलचं प्रोडक्शन वाढतं. ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं.

मेथीचं तेल

मेथी केसांची वेगाने वाढ करण्यासाठी आणि केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. मेथीच्या तेलाने डोक्याच्या त्वचा चांगली राहते आणि केसांसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. 

कसा कराल वापर?

या तेलांमुळे केसांची वाढ वेगाने होण्यास मदत मिळते. हे तेल केसांवर वापरण्याआधी हलकं गरम करावं आणि बोटांच्या मदतीने केसांवर लावा. तसेच डोक्याच्या त्वचेची हलक्या हाताने मालिश करावी. तेल केसांवर काही वेळासाठी राहू द्या आणि नंतर शाम्पूने केस धुवून घ्यावे.

Web Title: Hair Care : Ayurveda Oil for Hair Growth and stop Hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.