Join us  

केसात कंगवा घातला की केसांचा गुंता हातात येतो? १ सोपा उपाय, केस राहतील कायम दाट, लांबसडक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 1:20 PM

Hair Care Hair Growth Home Remedy : केस सतत गळू नयेत आणि ते छान लांबसडक वाढावेत यासाठी...

आपले केस दाट, लांबसडक असावेत अशी बहुतांश स्त्रियांची कायम इच्छा असते. पण काही जणींचे केस इतके जास्त प्रमाणात गळतात की केसांत कंगवा फिरवला तरी हातात मोठाच्या मोठा गुंता येतो. यामुळे अगदी काही दिवसांत केस विरळ दिसायला लागतात. काही महिलांना तर केस गळाल्याने डोक्यावर चक्क टक्कल असल्यासारखेही दिसते. केस हा स्त्रीच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असून ते छान असतील तर स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते. पण कधी केस खूप पांढरे होतात तर एकाएकी रुक्ष आणि निर्जिव दिसायला लागतात (Hair Care Hair Growth Home Remedy). 

यातच ते केस खूप गळत असतील आणि त्यामुळे विरळ झाले तर स्त्रियांना आणखीनच ताण येतो. यामुळे घरभर, कपड्यांवर आणि सगळीकडेच केसांचे साम्राज्य होते. अशावेळी केसांना तेल लावायला आणि केस धुवायलाही भिती वाटते. यावरच आज आपण एक अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा उपाय पाहणार आहोत. नैसर्गिक घटकांच्या वापरामुळे या उपायाने कोणतेही साइड इफेक्ट होण्याची शक्यता नसते. यामुळे केस छान दाट तर होतातच पण ते लांबसडक व्हायलाही चांगली मदत होते. हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया...

१. एका बाऊलमध्ये २ मोठे चमचे कोरफडीचा गर घ्यायचा आणि त्यामध्ये भिजवलेल्या तांदळाचे पाणी घालायचे. 

२. यामध्ये १ चमचा मध आणि थोडे खोबरेल तेल घालून सगळे चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

३. घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केलेला हा हेअर मास्क शाम्पू करण्याच्या अर्धा ते पाऊण तास आधी केसांना लावून ठेवायचा. 

(Image : Google)

४. या मास्कचा उपयोग आठवड्यातून २ वेळा करायला हवा ज्यामुळे केस दाट आणि मुलायम व्हायला मदत होते. 

५. केसांच्या मुळांशी आणि केसांना वरच्या बाजुने दोन्हीकडे हे मास्क लावून ठेवल्यास त्याचा चांगला फायदा होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी