Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ-झाडूसारखे झालेत? आजीनं सांगितलेला 'हा' खास उपाय करा; घनदाट-लांब होतील केस

केस पातळ-झाडूसारखे झालेत? आजीनं सांगितलेला 'हा' खास उपाय करा; घनदाट-लांब होतील केस

Hair Care Home Remedy : काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता ज्यामुळे केस गळणं थांबेल आणि केसांची वाढही चांगली होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:02 AM2024-08-05T00:02:02+5:302024-08-05T11:56:36+5:30

Hair Care Home Remedy : काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता ज्यामुळे केस गळणं थांबेल आणि केसांची वाढही चांगली होईल.

Hair Care Home Remedy : Use These Home Remedies For Long Hairs How To Grow Hairs Naturally | केस पातळ-झाडूसारखे झालेत? आजीनं सांगितलेला 'हा' खास उपाय करा; घनदाट-लांब होतील केस

केस पातळ-झाडूसारखे झालेत? आजीनं सांगितलेला 'हा' खास उपाय करा; घनदाट-लांब होतील केस

आजकालच्या जगात हेअर केअर (Hair Care Tips) उत्पादनांमध्ये वाढ होत आहे. अनेकजण ट्रेडीशनल इंडियन हेअर केअर पद्धतींचा वापर करत आहे. त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी लोक आजी-आजोबांच्या काळातील जुने  उपाय करत आहेत. काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता ज्यामुळे केस गळणं थांबेल आणि केसांची वाढही चांगली होईल, केसांचं तुटणंही कमी होईल. (Use These Home Remedies For Long Hairs How To Grow Hairs Naturally)

डाएट आणि न्युट्रिशन

भारतात केसांची काळजी घेण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी बऱ्याच उत्पादनांचा वापर केला जातो. व्हिटामीन्स मिनरल्स आणि प्रोटीन्स  केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. सुका मेवा, डाळी यांसारखे खाद्यपदार्थ भारतीय आहाराचा भाग आहेत.  जे केसांना आवश्यक पोषक तत्व प्रदान करतात.

वजन वाढत चाल्लंय-कपडे घट्ट होतात? रात्रीच्यावेळी 'हे' ७ पदार्थ खा, परफेक्ट फिगर-स्लिम दिसाल

अश्वगंधा, ब्राम्ही, भृंगराज

आयुर्वेदात केसांची काळजी घेण्यासाठी अनेक आयुर्वेदीक नैसर्गिक तत्वांचा वापर केला जात आहे. भृंगराज, अश्वगंधा आणि ब्राम्ही केसांना पोषण देतात किंवा केसांना मजबूत करण्यासाठी हेअर मास्क किंवा तेलांचा वापर करण्याची काही उदाहरणं आहेत.

केसांची मालिश

नियमित तेलाने मालिश करणं ज्याला चंपी असंही म्हटलं जातं. भारतीय केसांचे वेगवेगळे भाग आहेत नारळ, बदाम आणि शिकेकाई यांसारख्या तेलांनी स्काल्पची मसाज केल्यास  रक्ताभिसारण चांगले राहते. केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि  केसांच्या वाढीस मदत होते. 

३२ दातांचा पिवळेवणा हटवतील 'ही' पानं; रोज १ पानं चावून घ्या, चमकतील दात-दुर्गंधीही टळेल

हर्बल हेअर रिंस

कडुलिंब, अल्फाल्फा आणि ब्राम्ही यांसारख्या औषधी पदार्थांचा वापर  हर्बल हेअर रिंसमध्ये अनेक पिढ्यांपासून केला जात आहे. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या साफ राहण्यास मदत होते. केसांना कंडिशनिंग मिळते. या जडीबुटी केसांतील नैसर्गिक तेल काढून टाकतात आणि स्काल्प आणि केस चांगले राहतात.

हिटींग टुल्स

जास्त हिट स्टायलिंग केल्याने केसांची वाढ चांगली होत नाही. तुम्ही स्टायलिंग टुल्सचा  उपयोग कमी प्रमाणात करू शकता संतुलित आहार घ्या. आपल्या आहारात चांगल्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. केसांची काळजी घेण्याच्या दृष्टीने हिटींग टुल्सचा वापर टाळायला हवा. 

Web Title: Hair Care Home Remedy : Use These Home Remedies For Long Hairs How To Grow Hairs Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.