Lokmat Sakhi >Beauty > Hair Care : सुंदर केस हवे तर वापरा स्वतः घरी बनवलेले 3 प्रकारचे शाम्पू, विकतचे शाम्पू विसरून जाल

Hair Care : सुंदर केस हवे तर वापरा स्वतः घरी बनवलेले 3 प्रकारचे शाम्पू, विकतचे शाम्पू विसरून जाल

केसांची नॅचरल केअर घेण्यासाठी वापरा घरी केलेला शाम्पू... मध वापरुन करा 3 प्रकारचे शाम्पू ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 05:35 PM2022-06-08T17:35:21+5:302022-06-08T17:38:54+5:30

केसांची नॅचरल केअर घेण्यासाठी वापरा घरी केलेला शाम्पू... मध वापरुन करा 3 प्रकारचे शाम्पू ! 

Hair Care: If you want beautiful hair, use 3 types of home-made shampoos with honey. | Hair Care : सुंदर केस हवे तर वापरा स्वतः घरी बनवलेले 3 प्रकारचे शाम्पू, विकतचे शाम्पू विसरून जाल

Hair Care : सुंदर केस हवे तर वापरा स्वतः घरी बनवलेले 3 प्रकारचे शाम्पू, विकतचे शाम्पू विसरून जाल

Highlightsबाजारातील केमिकलयुक्त शाम्पूचा केसांवर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी मधाचा वापर करुन घरच्याघरी तीन प्रकारचे शाम्पू तयार करता येतात.

केसांची काळजी घेण्याची पहिली पायरी म्हणजे केस स्वच्छ धुणे. केस स्वच्छ धुण्यासाठी शाम्पूची गरज असते. शाम्पूमुळे केसात बसलेली घाणं, तेलकटपणा, केसांवर वापरलेल्या केमिकल प्रोडक्टमधले घातक रासायनिक घटक केसांना शाम्पू लावल्यास निघून जातात. केस स्वच्छ धुण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू मिळतात. पण बाजारातील केमिकलयुक्त शाम्पूचा केसांवर रिव्हर्स इफेक्ट होवून केस खराब होण्याचाही धोका असतो. बाजारातील केमिकलयुक्त शाम्पूचा केसांवर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी मधाचा वापर करुन  घरच्याघरी तीन प्रकारचे शाम्पू तयार करता येतात. 

Image: Google

मध आणि बेकिंग सोडा

मध आणि बेकिंग सोडा वापरुन शाम्पू तयार करण्यासाठी 1 मोठा चमचा मध, 3 मोठे चमचे फिल्टरचं पाणी, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा आणि सुवासासाठी इसेन्शियल ऑइल घ्यावं. हा शाम्पू तयार करताना काही सेकंद मायक्रोवेवमध्ये मध गरम करावं. मध थोडं गरम केल्यानं पातळ होतं. नंतर यात फिल्टर पाणी आणि बेकिंग सोडा घालून मिश्रण चांगलं एकजीव करावं. शेवटी इसेन्शियल ऑइलचे काही थेंब घालावेत.  शाम्पू लावण्याआधी केस ओले करावेत. केसांना शाम्पू लावावा. शाम्पू लावताना हलका मसाज करावा. नंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. 

Image: Google

मध आणि ॲपल सायडर
मध आणि ॲपल सायडरचा शाम्पू करताना पाऊण कप कॅस्टाइल सोप, पाऊण कप मध, 1 मोठा चमचा ॲपल सायडर, ऑरेंज आणि व्हॅनिला इसेन्शियल ऑइलचे काही थेंब घ्यावे.  एका मोठ्या भांड्यात सर्व सामग्री नीट एकत्र करुन घ्यावी. हे मिश्रण नंतर एका बाटलीत भरुन ठेवावं. शाम्पू तयार करताना मध थोडं गरम करुन घेतल्यास ते पातळ होतं.  इतर शाम्पू वापरता तसा हा शाम्पू वापरुन केस धुवावेत.  आठवड्यातून दोन वेळा मध आणि ॲपल सायडरचा शाम्पू केसांना लावल्यास चांगले परिणाम दिसतात. 

Image: Google

मध आणि कोरफड

कोरफडमुळे डोक्यातील खाज, सूज, कोंडा या समस्या दूर होतात. कोरफडमुळे केस शायनी होण्यासोबतच मजबूतही होतात. केस चांगले वाढण्यासाठी मध आणि कोरफडयुक्त शाम्पू मदत करतो.
मध आणि कोरफडचा शाम्पू तयार करण्यासाठी पाव कप कोरफडचा गर आणि 2 मोठे चमचे मध घ्यावं.  हा शाम्पू तयार करताना कोरफडची ताजी पात घेऊन त्याचा गर काढावा आणि त्यात मध घालावं. कोरफड गर आणि मध मिक्सरमधून एकत्र करुन घेतल्यास् ते चांगलं मिसळलं जातं. नेहमी केसांना शाम्पू लावतो तसा हा शाम्पू केसांना लावून केस धुवावेत. 
 
 

Web Title: Hair Care: If you want beautiful hair, use 3 types of home-made shampoos with honey.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.