केसांना पोषण मिळण्यासाठी काही गोष्टी जाणीवपुर्वक करणे गरजेचे असते. वेगवेगळे हेअरप्रोडक्ट वापरल्यामुळे किंवा मग केसांसाठी हानिकारक ठरणाऱ्या गोष्टी वारंवार केल्यामुळे केसांचे नुकसान होते. केसांमध्ये असणारे केरॉटीन तसेच इतर काही महत्त्वाचे द्रव्य कमी होत गेले की केस अगदी निस्तेज होतात. काही जणींच्या केसांना तर फाटे फुटतात आणि ते अगदीच झाडू सारखे कोरडे दिसू लागतात. अशा केसांचं काय करावं, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या काही गोष्टी नक्की करून पहा.
१. केसांसाठी योग्य प्रोडक्ट निवडातुमचे केस कुरळे असतील तर ते स्ट्रेट केसांच्या तुलनेत खूप लवकर त्यांच्यातले मॉईश्चर आणि इतर पोषक मुल्ये सोडून देतात. त्यामुळे कुरळे केस निस्तेज होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे कुरळ्या केसांना नियमितपणे तेल लावून मसाज करा. मसाज करताना ती अत्यंत हळूवार हाताने करावी. नियमित मसाज केल्याने केसांचा पोत मऊ होण्यास मदत होते. त्यामुळे कुरळ्या केसांसाठी नेहमी असेच हेअर प्रॉडक्ट्स निवडा जे त्यांना भरपूर मॉईश्चर आणि प्रोटीन्स देऊ शकतील. केवळ कुरळे केस असणाऱ्यांनीच नाही, तर सगळ्यांनीच silicone-sulphate-paraben-alcohol-free प्रोडक्ट वापरण्यास प्राधान्य द्यावे.
२. मऊ उशी घ्याआपण झाेपतो तेव्हा तब्बल ७ ते ८ तास आपले डोके उशीवर असते. उशी कशी आहे, तिचं टेक्स्चर कसं आहे, हे केसांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळेच नेहमी सिल्कचे कव्हर असणारी मऊशार उशी घ्यावी, असे काही सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.
३. व्यवस्थित कंडिशनिंग करजर तुमचे केस कोरडे असतील तर अशा केसांना खूप जास्त मॉईश्चर आणि पोषक मुल्यांची गरज आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा केसांसाठी उत्तम दर्जाचे आणि डिप कंडिशनिंग करणारे कंडिशनर वापरा. कोरड्या केसांचे जर चांगल्या प्रकारे कंडिशनिंग झाले तर ते लवकरच चमकदार आणि निरोगी दिसू लागतील.आठवड्यातून एकदा तरी केसांना कंडिशनर लावलेच पाहिजे.
४. या गोष्टींचे सेवन कराकेसांवर बाह्य उपाय करणे जसे गरजेचे आहे, तसेच तुमच्या आहारातून केसांना काही पोषक गोष्टी मिळणे आवश्यक असते. बाह्य उपाय करूनही केसांचा निस्तेजपणा कमी होत नसेल, तर काही गोष्टींचे सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन्स, ओमेगा ॲटी ॲसिड, बायोटीन, कोलॅजीन यांचा पुरवठा करणाऱ्या काही औषधी बाजारात उपलब्ध असतात. जर आहारातून पोषण मिळत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी औषधी घेण्यास हरकत नाही.
५. केसांवर सारख्या ट्रिटमेंट नकोज्या महिलांचे केस कुरळे असतात, त्या महिला हेअर स्ट्रेटनिंग किंवा हेअर सॉफ्टनिंगसारख्या प्रक्रिया आपल्या केसांवर वारंवार करून घेतात. या प्रकियांमुळे काही काळासाठी तुमचे केस निश्चितच चांगले दिसतात. पण वारंवार हे सगळं करून घेतल्याने केसांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे तुमच्या केसांना ते आहेत तसे स्विकारा. कुरळ्या केसांच्या काही खास हेअरस्टाईल करता येतात. या हेअरस्टाईल करण्यासाठी केसांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्याची गरज नसते. अशा हेअर स्टाईल केल्या तर तुमचे केस निश्चितच अधिक आकर्षक आणि अधिक देखणे दिसू लागतात. त्यामुळे अशा काही हेअरस्टाईल ट्राय करा. तुम्हाला तुमचे केस जसे आहेत तसे आवडू लागतील.