केस सुंदर होण्यासाठी केसांवर विविध हेअर प्रोडक्टस वापरले जातात. पण केस नुसते सुंदर असून चालत नाही तर मजबूतही असणं आवश्यक आहे. केस खूप गळत असतील तर साहजिकच त्याचा अर्थ केस मजबूत नाही. केस मजबूत होण्यासाठी हेअर स्ट्रेथनिंग क्रीम वापरणं आवश्यक आहे. हे हेअर स्ट्रेथनिंग क्रीम घरच्याघरी सहज तयार करता येतं. हे क्रीम वापरण्याची विशिष्ट पध्दत आहे. ती समजून घेतल्यास घरच्याघरी हेअर स्ट्रेथनिंग क्रीम तायर करुन वापरणं सहज शक्य आहे.
Image: Google
हेअर स्ट्रेथनिंग क्रीम कसं करावं ?
हेअर स्ट्रेथनिंग क्रीम तयार करण्यासाठी 2 पिकलेली केळी, 2 चमचे आंबट दही, 2 मोठे चमचे ऑलिव्ह तेल आणि 2 चमचे मध घ्यावं.
एका वाटीत केळ सोलून फोर्कच्या मदतीनं कुस्करुन घ्यावं. कुस्करलेल्या केळामध्ये दही, ऑलिव्ह ऑइल आणि मध घालून हे सर्व चांगलं मिसळून घेतलं की घरच्याघरी हेअर स्ट्रेथनिंग क्रीम तयार होतं.
Image: Google
या हेअर स्ट्रेथनिंग क्रीममधून केसांना फॅटी ॲसिड, अ,ब आणि क जीवनसत्व, लोह, फाॅस्फरस, लॅक्टिक ॲसिड, कॅल्शियम, कोलेस्ट्राॅल आणि सोडियम हे महत्वाचे घटक मिळतात. या घटकांमुळे केस मजबूत होतात. केस सरळ होण्यासाठीही या हेअर स्ट्रेथनिंग क्रीमचा उपयोग होतो. या क्रीममधील केळ आणि ऑलिव्ह ऑइलमुळे केस मऊ, मजबूत, रेशमी आणि चमकदार होतात.
घरच्याघरी तयार केलेली हेअर स्ट्रेथनिंग क्रीम केसांना लावल्यास केसांची वाढ होण्यास मदत होते. केस चमकदार होतात. केसांमध्ये खूप गुंता होत असल्यास हे हेअर स्ट्रेथनिंग क्रीम अवश्य वापरावं. या क्रीममुळे केसांमध्ये आर्द्रता निर्माण होते आणि यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही.
Image: Google
हेअर स्ट्रेंथनिंग क्रीम केसांना कसं लावावं?
हेअर स्ट्रेथनिंग क्रीम केसांना लावताना केस कोरडे हवेत. क्रीम लावण्याआधी केस कंगव्यानं चांगले विंचरुन घ्यावेत. क्रीम लावण्यास सोपं जावं यासाठी मेहंदी लावण्यासाठी ज्याप्रमाणे केसांच्या छोट्या छोट्या बटांमध्ये केस विभागावेत. हे क्रीम केसांना लावताना ब्रशचा वापर करावा. केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत हेअर क्रीम लावावं. मुळांना ब्रशनं क्रीम लावून बोटांनी ते केसांच्या टोकापर्यंत पसरवावं. अर्धा तास केसांना हेअर स्ट्रेथनिंग क्रीम राहू द्यावं. केस धुताना केसांना शाम्पू लावू नये. केसांना कंडीशनर लावावं. कंडीशनर केसांना लावल्यावर ते 5 मिनिटं ठेवावं. नंतर केस थंड पाण्यानं धुवावेत. केस धुतल्यानंतर मोठ्या दातांच्या कंगव्यानं किंवा हेअर ब्रशनं केस विंचरावेत. केस नैसर्गिकरित्या वाळू द्यावेत. हेअर स्ट्रेथनिंग क्रीम आठवड्यातून 2-3 वेळा लावावं. स्ट्रेथनिंग क्रीममुळे केस नैसर्गिकरित्याच इतके सुंदर होतात की केसांना वेगळं स्टायलिंग जेल लावण्याची गरज नसते.