केस मऊ- चमकदार असतील तर खूपच सुंदर दिसून येतात. गरजेपेक्षा जास्त कोरडे, रुक्ष केस झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. केस गरजेपेक्षा जास्त गळणं, जास्त पातळ होणं अशा समस्या जाणवतात. (How to Stop Hair Fall) अशा स्थितीत काही सोपे उपाय तुमचं काम सोपं करू शकतात. केसांना दाट, मऊ बनवण्यासही मदत होईल. (Hair Care Tips) यामुळे केसांची वाढ चांगली होईल. रोजच्या जगण्यातील काही चुकांमुळे केस गळती वाढते. (How to Stop Hair Fall Immediately)
केस वाढवण्यासाठी काय करावे?
१) केस विंचरून झोपा
ज्यावेळी केस गुंता होतात तेव्हा ते जास्त तुटतात. अशा स्थितीत केस सोडवून झोपण जास्त फायदेशीर ठरतं, कारण केसांमध्ये गुंता असताना झोपले तर केस अधिकच खराब दिसू शकतता. केसांना व्यवस्थित कंगव्याने न विंचरल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते ज्याचा केसांना पुरेपूर फायदा होतो.
नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल
२) फार घट्ट वेणी बांधून झोपून नका
केसांची घट्ट वेणी बांधून झोपल्यामुळे केस खेचले जातात आणि केस फार तुटतात. यामुळे स्काल्पमध्ये तणाव निर्माण होतो याशिवाय वेदनाही जाणवतात. अशा स्थितीत केसांना गरजेपेक्षा घट्ट न बांधता केस लूज बांधा
३) सिल्कचे कव्हर
अनेकदा उशांचे कव्हर केस तुटण्याचे कारण ठरतात. यामुळे हेअर डॅमेजचा धोका वाढत. सिल्कचे कव्हर न लावात तुम्ही साधे कॉटनचे कव्हर्स लावा यामुळे केसांच्या टेक्चर चांगले राहील.
४) ओल्या केसांसह झोपू नका
अनके महिला आपला वेळ वाचवण्यासाठी आणि सकाळी घाई होऊ नये म्हणून रात्रीच्यावेळी केस धुतात. पण यामुळे केस व्यवस्थित सुकत नाहीत. ओल्या केसांसह झोपल्यामुळे केस लवकर तुटतात म्हणून केस व्यवस्थित सुकवून मगच झोपा.
मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस
५) हिटींग टुल्सचा वापर करू नका
स्ट्रेटनिंग स्मूथनिंग अशा हिटींग टुल्सचा वापर केल्यामुळे केस मुळांपासून कमकुवत होतात. केस जास्त प्रमाणात कोरडे झाल्यामुळे गळू लागतात. हे टाळण्यासाठी केस नैसर्गिकरित्या सुंदर जसे दिसतील तसेच राहू द्या. केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करू नका.