केस खूप गळत असतील, केसांची वाढ खुंटली असेल, केस अकाली पांढरे (gray hair) होऊ लागले असतील किंवा केसांत खूप कोंडा होऊन दुर्गंधी येत असेल तर हा सोपा घरगुती उपाय (home remedy) तुम्हाला या सगळ्या समस्यांमधून सोडवू शकतो. कांद्याचा रस आणि एरंडेल तेल (castor oil for hair).. बस या दोन गोष्टी योग्य प्रमाणात वापरल्या तरी केसांच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या सोडवू शकाल.. त्यासाठी फक्त या दोन्ही पदार्थांचा अचूक वापर करता यायला हवा. केसांसाठी एरंडेल तेल आणि कांद्याचा रस यांचा कसा वापर करायचा, याविषयीच्या टिप्स hairgrowth.fast या इन्स्टाग्राम पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत.
एरंडेल तेल केसांसाठी कसे ठरते फायदेशीर?- एरंडेल तेलामध्ये ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरते.- एरंडेल तेलांमध्ये असणारे गुणधर्म डोक्याच्या त्वचेतील रक्तप्रवाह वेगवान करतात. यामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळून केस मजबूत होतात.- एरंडेल तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, वेगवेगळी खनिजे आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी खनिजे असतात.
कसा करायचा वापर?- एरंडेल तेल आणि कांद्याचा रस १: २ या प्रमाणात एका बाऊलमध्ये घ्या. मिश्रण व्यवस्थित हलवा आणि कापसाच्या साहाय्याने केसांच्या मुळांशी लावा. साधारण १ तासानंतर केस स्वच्छ धुवून टाका. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची चांगली वाढ होते.
केसांसाठी खोबरेल तेल आणि आवळा पावडर- केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढले असेल तर हा एक सोपा उपाय करून बघा.- यासाठी ३ टेबलस्पून खोबरेल तेलामध्ये १ टेबलस्पून आवळा पावडर टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी लावा. एक ते दिड तासाने केस नेहमीप्रमाणे शाम्पू करून धुवून टाका.