बाई गं! केसांच्या गळतीमुळे हैराण झाले, केस वाढतच नाही.. हे वाक्य रोज अनेकांच्या कानावर पडत असतील. बदलत्या ऋतूनुसार आरोग्य, त्वचा यासह केसांच्या समस्या वाढतात. मुख्य म्हणजे पावसाळ्यात केसांच्या समस्या छळतात. अनेकदा महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करूनही केसांच्या समस्या सुटत नाही.
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची वाढ खुंटते. हेअर ग्रोथ खुंटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जर आपल्याला नैसर्गिकरित्या केसांची वाढ हवी असेल तर, टीव्ही अभिनेत्री शीबा आकाशदीप यांनी मेथीच्या दाण्यांचा नैसर्गिक नुस्खा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे(Hair Care: Prepare This Oil With Just Two Ingredients To Control Hair Fall, Dandruff And More).
हेअर ग्रोथ ऑईल करण्यासाठी लागणारं साहित्य
एक चमचा - काळे बियाणे
एक चमचा - मेथी दाणे
एक चमचा - एरंडेल तेल
चिमूटभर हळदीचे ३ उपाय, केसांचं पांढरं होणं कमी करतील आणि कोंडाही होईल गायब
दोन चमचे - खोबरेल तेल
कृती
सर्वप्रथम, कलोंजी आणि मेथी दाणे बारीक करून त्याची पावडर तयार करा. ही पावडर एका काचेच्या डब्यात ठेवा. त्यात खोबरेल तेल आणि एरंडेल तेल मिक्स करा. आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा, त्यात तयार तेलाची बॉटल ५ मिनिटांसाठी ठेवा, व उकळी आल्यानंतर बाहेर काढा. थंड करण्यासाठी तेल चाळून एका वाटीत काढून घ्या, अशा प्रकारे हेअर ग्रोथ ऑईल रेडी.
केसांवर हेअर ग्रोथ ऑईल लावण्याची पद्धत
हेअर वॉशच्या ३० मिनिटापूर्वी केस चांगले विंचरून घ्या.
स्काल्पवर या तेलाने मसाज करा.
त्यानंतर केसांवर हॉट टॉवेल बांधा.
३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवून घ्या.
हेअर ग्रोथसाठी मेथीचे फायदे
मेथीच्या दाण्यांमध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे पौष्टीक घटक केसांच्या निरोगी वाढीसाठी उपयुक्त ठरतात. यासह केस गळणे, कोंडा, कोरडे केस इत्यादी केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
पावसाळ्यात चिखलांतून वाट काढताना पाय काळवंडले? ४ घरगुती उपाय- पाय दिसतील स्वच्छ
हेअर ग्रोथसाठी कलोंजीचे फायदे
कलोंजीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे स्काल्प स्वच्छ करण्यास मदत करते. कलोंजीच्या तेलामध्ये लिनोलिक अॅसिड असते, ज्यामुळे पांढरे केस आणि केस गळती कमी होते.