कधीकधी केस एवढे कोरडे, रुक्ष दिसतात (dry and dull hair) की त्यांच्यातला सगळा चार्म निघून गेल्यासारखं वाटतं. त्यांच्यात खूपच डलनेस येतो. त्यामुळे असे केस मोकळे सोडणं पण चांगलं दिसत नाही. आणि एखादी हेअरस्टाईल केली तरी त्यातूनचही केसांचा कोरडेपणा, रुक्षपणा लगेच दिसून येतो. म्हणूनच तर नारळाच्या दुधाचा (coconut milk) हा एक उत्तम उपाय करून बघा आणि अशा कोरड्या, रुक्ष केसांना करा बाय बाय. ३ पद्धतीने केसांना नारळाचं दूध लावता येतं. या उपायामुळे केस चमकदार आणि अतिशय सिल्की होतात. (how to get silky hair?)
केसांसाठी नारळाच्या दुधाचे फायदे (benefits of coconut milk)
- नारळामध्ये व्हिटॅमिन सी, ई, बी ६ तसेच लोह, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं.
- नारळाच्या दुधातले पौष्टिक घटक डोक्याच्या त्वचेसाठी अतिशय पोषक ठरतात. स्काल्पची पीएच लेव्हल संतूलित ठेवतात. यामुळे आपाेआपच केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- नारळाचा वापर केल्यामुळे केसांची वाढही भराभर होते.
- केसांचा कोरडेपणा तर नारळाच्या दुधाने कमी होतोच, पण केस चिकट असतील तर तो त्रासही दूर होतो. केस सिल्की आणि रेशमासारखे मऊ होण्यासाठी नारळाचं दूध उपयुक्त ठरतं.
केस गळणं थांबविण्यासाठी रामबाण उपाय, केस होतील दाट- राहतील काळेभोर
कसं तयार करायचं नारळाचं दूध
- नारळाचं दूध करण्यासाठी नारळाचे बारीक काप करून घ्या आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- मिक्सरमध्ये फिरवताना त्यात पाणीदेखील टाकावे. साधारण एक वाटी नारळाचे काप असतील तर त्यासाठी एक वाटी पाणी घ्यावे.
- मिक्सरमधून फिरवून अतिशय बारीक पेस्ट करून घ्यावी. त्यानंतर गाळण्याने किंवा सुती कपड्याने गाळून घेऊन नारळाचं दूध वेगळं काढावं. हे दूधच आपल्याला केसांसाठी वापरायचं आहे.
केसांसाठी अशा पद्धतीने वापरा नारळाचं दूध
१. नारळाचं दूध आणि ऑलिव्ह ऑईल
नारळाचं दूध आणि ऑलिव्ह ऑईल हे दोन्ही पदार्थ २: १ या प्रमाणात घ्यावेत. ते व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. आता हे मिश्रण हलक्या हाताने मसाज करत केसांच्या मुळाशी लावा. तसेच केसांच्या लांबीवरही लावावे. २० ते २५ मिनिटे केस तसेच बांधून ठेवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून धुवून टाका. काही महिने नियमितपणे हा उपाय आठवड्यातून एकदा करावा. केसांचे टेक्स्चर सुधारण्यास मदत होईल.
२. नारळाचं दूध आणि मध
मधाला नॅचरल कंडिशनर म्हणून ओळखलं जातं. कारण केसांना एक प्रकारचा मऊपणा देण्यासाठी मध अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळेच केसांचा कोरडेपणा कमी करायचा असेल तर नारळाचं दूध आणि मध हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. यासाठी नारळाचं दूध ३ चमचे घेणार असाल तर मध १ चमचा घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि डोक्याच्या त्वचेला तसेच केसांच्या लांबीवर लावा. १५ ते २० मिनिटांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. केसांमध्ये छान मऊपणा जाणवू लागेल.
३. नारळाचं दूध आणि मेथ्या
केसांच्या उत्तम वाढीसाठी मेथीचे दाणेही अतिशय उपयुक्त असतात. म्हणूनच हे दोन्ही पदार्थ जर एकत्र करून केसांना लावले तर केस अधिकच चमकदार होतील तसेच त्यांची वाढही उत्तम होईल. हा उपाय करण्यासाठी मेथीचे चमचाभर दाणे ७ ते ८ तास पाण्यात भिजू द्या. त्यानंतर त्यांची मिक्सरमध्ये फिरवून बारीक पेस्ट करा. दाणे मिक्सरमधून फिरवताना त्यात नारळाचं दूध टाका. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेला लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. केस सिल्की तर होतीलच पण त्यांची वाढही भराभर होईल.