Join us  

घरच्याघरी हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा.. नाहीतर केसांचं होईल नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 8:10 AM

Avoid These Common Hair Straightener Mistakes: घरच्याघरी केसांचं स्ट्रेटनिंग अनेकजणी करतात. पण स्ट्रेटनिंग करताना काही चुका वारंवार होत गेल्या तर केसांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. 

ठळक मुद्देघरच्याघरी हेअर स्ट्रेटनिंग करणं हे बजेटमध्ये बसणारं असलं तरी ते करताना जर काही चुका झाल्या तर मात्र त्या आपल्याच अंगलट येऊ शकतात

हेअर स्ट्रेटनिंग करणं आता एवढं कॉमन झालं आहे की अनेक जणींना त्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरजही वाटत नाही.  खिशाला परवडणाऱ्या किमतीत सध्या हेअर स्ट्रेटनर ( Hair Straightener) विकत मिळतात. त्यामुळे ते एकदा खरेदी केलं की मग केस स्ट्रेट करायला वारंवार पार्लरमध्ये जाण्याची आणि तिथे जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नसते. म्हणूनच घरच्याघरी हेअर स्ट्रेटनिंग  (Hair Straightening) करणं हे बजेटमध्ये बसणारं असलं तरी ते करताना जर काही चुका झाल्या तर मात्र त्या आपल्याच अंगलट येऊ शकतात आणि  त्यामुळे केसांचं प्रचंड नुकसान (hair care tips) होऊ शकतं. त्या चुका नेमक्या कोणत्या याची माहिती इन्स्टाग्रामच्या beautyandhealthwithakanksha या पेजवर देण्यात आली आहे. 

 

हेअर स्ट्रेटनिंग करताना टाळा ३ चुका१. ओल्या केसांवर कधीही स्ट्रेटनर नको..बऱ्याचदा ऑफिसला किंवा मग कुठे बाहेर जाण्याची गडबड असते. अशावेळी ओले केस लवकर सेट व्हावेत, असं वाटतं.

Navratri 2022 : ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे पहा १० स्टायलिश प्रकार, एक से एक डिझाइन्स! नवरात्रासाठी खास..

त्यामुळे मग केस वाळण्याची वाटही बघितली जात नाही आणि केसांवरून सरळ स्ट्रेटनर फिरवलं जातं. पण ओले केस नाजूक असतात. त्यावर जर गरम स्ट्रेटनर फिरवलं तर बदलत्या तापमानाशी जुळवून घेणं त्यांना अवघड जातं आणि त्यामुळे केसांचं नुकसान होऊन ते अधिक कोरडे, ड्राय होतात. 

 

२. वारंवार स्ट्रेटनर फिरवणेस्ट्रेटनर फिरवूनही काही वेळा केसांचा काही भाग लवकर सेट होत नाही.

दसरा- दिवाळीसाठी घरारा घ्यायचा की शरारा? या दोन्हीत नेमका काय फरक असतो, तुम्हाला काय शोभून दिसेल?

मग काही जणी त्याच त्या भागावरून वारंवार स्ट्रेटनर फिरवतात आणि तो भाग स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतात. पण एकाच भागावरून अशा पद्धतीने वारंवार स्ट्रेटनर फिरवणे, केसांसाठी खूपच नुकसानदायक असते.

 

३. स्प्रे वापरायला विसरू नकास्ट्रेटनरद्वारे निर्माण होणारी उष्णता केसांसाठी हानिकारक असते. या उष्णतेपासून केसांचा बचाव होण्यासाठी स्ट्रेटनिंग करण्यापुर्वी केसांवर heat protectant spray लावायला विसरू नका. त्यामुळे केसांतलं मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी