Join us  

केस गळणं कमी करणारा आयुर्वेदिक उपाय, नेहमीच्याच खोबरेल तेलात घाला २ पदार्थ आणि पाहा फरक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 5:18 PM

Ayurvedic Solution For Reducing Hair Loss: केस गळणं कमी करण्यासाठी हा एक उपाय करून बघा. अगदी साधा आणि सोपा. त्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करण्याची मुळीच  गरज नाही. 

ठळक मुद्देआठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाने डोक्याला मालिश करा. 

केस गळण्याची समस्या खूपच वाढली आहे. काही जणांचे केस तर एवढे जास्त गळतात की ते पाहून लवकरच टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागते. केसांमधून हात फिरवला की अगदी मुळासकट केस निघून आल्याचा अनुभव तर अनेक जणींना येतो. केस धुतल्यानंतर तर अनेकदा बाथरुममध्ये खूप गळून गेलेले केस दिसतात. असा अनुभव तुम्हालाही येत असेल आणि केस गळण्याचं प्रमाण वाढलंय असं जाणवत असेल तर हा एक सोपा उपाय करून बघू शकता. (Ayurvedic home remedies for reducing hair fall)

हिवाळ्यात पडणाऱ्या थंडीचा परिणाम डोक्याच्या त्वचेवरही होतो. अंग जसं कोरडं पडतं, तसंच डोक्याची त्वचाही कोरडी पडते. यामुळे केसांत कोंडा होण्याचं प्रमाण वाढतं आणि मग त्यामुळेही केस जरा जास्तच गळू लागतात.

हा डान्स आहे की व्यायाम? स्वत:च्याच लग्नात नवरीचा भलताच डान्स पाहून वऱ्हाडींना पडला प्रश्न, पाहा व्हायरल व्हिडिओ

अशा कोणत्याही कारणामुळे केस गळणं सुरू असल्यास ते थांबविण्यासाठी हा उपाय परिणामकारक ठरू शकतो. फक्त ज्यांना टक्कल पडलेलं आहे, त्यांच्यासाठी हा उपाय फारसा उपयुक्त नाही, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या hirayogi या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

केस गळणं कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला १०० मिली अनरिफाईंड खोबरेल तेल, ४० ग्रॅम मेथी दाणे आणि १० ग्रॅम मिरे लागणार आहेत.

२. तेल एका पातेल्यात घेऊन गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात मेथ्या आणि मिरे टाका.

थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी

३. तेलाला एक चांगली उकळी आली की पुढच्या ३ ते ४ मिनिटांत गॅस बंद करा. 

४. तेल थंड झालं की गाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा.

५. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाने डोक्याला मालिश करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीघरगुती उपाय