प्रत्येक स्त्रीला जाड आणि लांबसडक केस आवडतात. स्त्रिया जाड आणि सुंदर केसांसाठी काहीही करायला तयार असतात. हिवाळ्यात थंड हवेमुळे केस गळतात तर कधी खडबडीत होतात. रुक्ष आणि कोरडे केस लवकर खराब होतात. गोंधळलेले केस पक्त तुमचा लूक खराब करत नाही तर लवकर तुटतात सुद्धा. (Hair Care Tips) आपले केस चांगले राहण्यासाठी काहीही करण्याची मुलींची तयारी असते. केस चांगले राहण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी २ वेळा केस चांगली विंचरायला हवेत. हिवाळ्यात केस जास्त कोरडे पडू नयेत केसांमध्ये गुंता होऊ नये यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर
विस्कटलेले केस चांगले ठेवण्यासाठी मोठे दात असलेला कंगवा खूप चांगला ठरतो. केस विंचरण्यासाठी करण्यासाठी मोठ्या दात असलेला कंगवा वापरा. गुंतलेले केस मोठ्या दात असलेल्या कंगव्याने सहजपणे विंचरले जाऊ शकतात.
कंडीशनरचा वापर करा
केस विंचरण्यासाठी केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरा. कंडिशनर वापरल्याने केस मऊ आणि मुलायम राहतील. त्यामुळे केस गुळगुळीत राहतात. हिवाळ्यात कोमट पाण्याने केस धुतल्याने केसांची क्यूटिकल उघडतात, त्यामुळे केसांमध्ये गुंता होतो.
स्कार्फचा वापर
केसांची काळजी घेण्यासाठी व्यवस्थित कव्हर करणं खूप महत्वाचं असतं. खासकरून हिवाळ्यात जेव्हा वातावरणात गारवा असतो तेव्हा केसांचे मॉईश्चर कमी होते त्यामुळे केस जास्त गुंता होतात. केस चांगले राहण्यासाठी बाहेर जाताना नेहमी स्कार्फनं कव्हर करायला हवेत.
केसांची वेणी घालणं
रात्री झोपण्यापूर्वी वेणी घालणे आवश्यक आहे. वेणी घालून झोपल्याने केसांमध्ये गुंता होत नाही. स्थिर असलेले केस कमी तुटतात, त्यामुळे केस दाट राहतात. फक्त हिवाळ्यातच नाही तर नेहमीच तुम्ही रात्री केसांची वेणी घालूनच झोपण्याची सवय लावायला हवी.