Join us  

Hair Care Tips: केस खरंच वारंवार कापल्याने दाट होतात का? गळणे थांबते का? काय खरं काय खोटं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 5:01 PM

Hair Care Tips: केस खूपच पातळ झाले होते, म्हणून कापून टाकले.. आता होतील छान दाट.... असा संवाद आपण अनेक मैत्रिणींचा ऐकतो.. पण खरंच तसं असतं का?

ठळक मुद्देकेस वारंवार कापल्यानेही वाढणार नाहीत आणि महागड्या कॉस्मेटिक्सचा केसांवर मारा केल्यानेही त्याचा काही उपयोग होणार नाही.

केस कापण्याची अनेक कारणं आहेत. कोणी केस सेट करण्यासाठी ते कापतात, कोणाला हेअरस्टाईल (hair care tips) बदलायची असते, म्हणून ते केस कापतात, तर कुणी केस दुभंगले म्हणून ते ट्रिम करतात. पण यासोबतच अशाही काही मैत्रिणी असतात ज्या केस खूप पातळ झाले आहेत किंवा केस गळू लागले आहेत, म्हणून हा त्रास कमी होण्यासाठी केस कापतात. पण खरंच असं केस कापून फायदा होतो का? कापल्यामुळे केस मजबूत होऊन त्यांचं गळणं कमी होतं का?

 

याविषयी सांगताना सौंदर्यतज्ज्ञ डॉ. मंजुल अग्रवाल म्हणतात की केस वाढत नाहीत, त्यांची चांगली वाढ व्हावी, म्हणून ते वारंवार कापले जातात. पण वास्तवात केस कापण्याचा आणि त्यांच्या वाढीचा काहीही संबंध नाही. कारण केसांच्या वाढीसाठी आपल्या स्काल्पमध्ये असणारे फॉलिकल्स उपयुक्त ठरत असतात. आणि केस कापण्याचा आणि या फॉलिकल्सचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे केस वाढण्यासाठी ते कापत असाल, तर तसं करू नका. त्यापेक्षा केसांंचं ट्रिमिंग करणं उपयुक्त ठरतं.

 

केस छान वाढवायचे आहेत, मग हे करा...(solution for long and strong hair)- केस वारंवार कापल्यानेही वाढणार नाहीत आणि महागड्या कॉस्मेटिक्सचा केसांवर मारा केल्यानेही त्याचा काही उपयोग होणार नाही. केस छान वाढवायचे असतील तर केसांना योग्य पोषण मिळणं गरजेचं आहे.- हे पोषण आहारातून मिळतं. त्यामुळे आपल्या आहारात केसांच्या वाढीसाठी उपयुक्त पदार्थ घेत चला. गाजर, हिरव्या पालेभाज्या, दुध, पनीर, छोले, चणे, सोयाबीन, बदाम, अक्रोड असे पदार्थ घ्यावेत.  - केसांना व्हिटॅमिन सप्लिमेंट दिल्यानेही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. व्हिटॅमिन सप्लिमेंटमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि लोह असते. ही खनिजे स्काल्पला पोषण देतात. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येतो.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीआरोग्य