Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips : केस मुलायम व्हावेत म्हणून सिरम वापरता? लक्षात ठेवा ४ गोष्टी...केस होतील सिल्की आणि शायनी

Hair Care Tips : केस मुलायम व्हावेत म्हणून सिरम वापरता? लक्षात ठेवा ४ गोष्टी...केस होतील सिल्की आणि शायनी

Hair Care Tips : सिरम विकत घेताना त्याची निवड कशी करायची, ते लावताना काय काळजी घ्यायची याविषयी समजून घेणे आवश्यक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2022 04:51 PM2022-04-24T16:51:04+5:302022-04-24T17:09:04+5:30

Hair Care Tips : सिरम विकत घेताना त्याची निवड कशी करायची, ते लावताना काय काळजी घ्यायची याविषयी समजून घेणे आवश्यक आहे.

Hair Care Tips: Do you use serum to soften hair? Remember 4 things ... hair will be silky and shiny | Hair Care Tips : केस मुलायम व्हावेत म्हणून सिरम वापरता? लक्षात ठेवा ४ गोष्टी...केस होतील सिल्की आणि शायनी

Hair Care Tips : केस मुलायम व्हावेत म्हणून सिरम वापरता? लक्षात ठेवा ४ गोष्टी...केस होतील सिल्की आणि शायनी

Highlightsकेसांना एकप्रकारचे कवच मिळते आणि केस खराब होण्यापासून त्यांचा बचाव होतो. सिरम लावताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहित असणे आवश्यक आहे

आपले केस सिल्की, मुलायम असावेत असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी आपण काही ना काही उपायही करत असतो. सौंदर्यात भर पडावी यासाठी आपण केसांची विशेष काळजी घेतो. यासाठी आपण विविध सौंदर्यउत्पादने वापरतो. गेल्या काही वर्षांपासून हेअर सिरम वापरण्याची क्रेझ तरुणींमध्ये वाढली आहे. (Hair Care Tips) केस खूप कोरडे आणि रखरखीत दिसू नयेत म्हणून हे सिरम वापरले जाते. विविध कंपन्यांची सिरम सध्या बाजारात उपलब्ध असून वेगवेगळ्या किमतीला ती मिळतात. सिरममुळे केस चमकदार दिसण्यास मदत होते. प्रदूषण, ऊन, हवा किंवा इतर गोष्टींपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी सिरम अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. सिरम म्हणजे एक सिलीकॉन बेस असलेले लिक्वीड असते, तसेच हे एकप्रकारचे अमिनो अॅसिड असून केसांना पोषण देण्याचे काम याद्वारे केले जाते. असे असले तरी सिरम विकत घेताना त्याची निवड कशी करायची, ते लावताना काय काळजी घ्यायची (Right way to use serum) याविषयी समजून घेणे आवश्यक आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

१. सिरम निवडताना 

आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन सिरमची निवड करायला हवी. ज्यांचे केस खूप ऑयली असतात त्यांनी थोडे हलक्या स्वरुपाचे सिरम निवडावे. कारण ऑयली केस आधीच चमकदार असतात आणि अशा केसांच्या मूळांतून तेलाची निर्मिती होत असल्याने सिरम कमी लावावे लागते. तसेच तुमचे केस मोठे असतील तर क्रिम असलेले सिरम निवडायला हवे, त्यामुळे केसांचे चांगले पोषण होते. तुम्ही स्टायलिंग टूलचा वापर करत असाल तर केरोटीन असलेले सिरम वापरायला हवे. यामुळे केस फक्त चांगले दिसत नाहीत तर ते मजबूत होण्यास मदत होते. 

२. ओल्या केसांवर सिरम लावा

ओल्या केसांवर सिरम लावणे केव्हाही जास्त चांगले, कारण त्यामुळे केसांमध्ये ते व्यवस्थित एकजीव होते. त्यामुळे केस धुतल्यानंतर ते थोडे वाळवून थोडे ओलसर असताना सिरम लावले तर जास्त चांगले रिझल्ट मिळतात. 

३. हातावर चोळून मग लावा

सिरम हातावर घेतल्यावर दोन्ही हात एकमेकांवर चोळा. त्यामुळे सिरम काहीसे गरम होईल आणि मग दोन्ही हात आपल्या केसांवर चोळा. त्यामुळे त्यातील घटक केसांवर जास्त चांगला परिणाम करतात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. प्रमाण ठरवा 

आपले केस दाट किंवा खूप जास्त मोठे असतील तर ४ ते ५ थेंब सिरम घेऊ शकतो. मात्र आपले केस लहान असतील तर २ थेंब सिरम पुरेसे असते. जास्त प्रमाणात सिरम लावल्यास केस चिकट दिसू शकतात. तसेच सिरम हे केसांच्या मूळांशी आणि त्वचेला लावायचे नसते तर ते केवळ वरच्या केसांवर चोळायचे असते. सिरम नेहमी धुतलेल्या केसांवर लावावे. म्हणजे केसांना एकप्रकारचे कवच मिळते आणि केस खराब होण्यापासून त्यांचा बचाव होतो. 
 

Web Title: Hair Care Tips: Do you use serum to soften hair? Remember 4 things ... hair will be silky and shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.