Lokmat Sakhi >Beauty > Hair care Tips : केस चमकदार, मुलायम हवेत? लावा ही एकच गोष्ट, केस होतील सिल्की आणि शायनी...

Hair care Tips : केस चमकदार, मुलायम हवेत? लावा ही एकच गोष्ट, केस होतील सिल्की आणि शायनी...

Hair care Tips : आहारात तर तूप असायलाच हवे, पण केसांना तूप लावल्याने त्यांची चमक आणि मुलायमपणा वाढतो. आता तूप केसांना नेमके कसे लावायचे आणि त्याचे कसे फायदे होतात याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 05:05 PM2022-02-27T17:05:01+5:302022-02-28T19:26:39+5:30

Hair care Tips : आहारात तर तूप असायलाच हवे, पण केसांना तूप लावल्याने त्यांची चमक आणि मुलायमपणा वाढतो. आता तूप केसांना नेमके कसे लावायचे आणि त्याचे कसे फायदे होतात याविषयी...

Hair care Tips: Do you want shiny, soft hairs? use one, hair will be silky and shiny...Apply ghee | Hair care Tips : केस चमकदार, मुलायम हवेत? लावा ही एकच गोष्ट, केस होतील सिल्की आणि शायनी...

Hair care Tips : केस चमकदार, मुलायम हवेत? लावा ही एकच गोष्ट, केस होतील सिल्की आणि शायनी...

Highlightsतूपामध्ये केसांची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक असल्याने त्याचा फायदा होतो. तूपात असलेल्या व्हीटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी मुळे केसांचा रफनेस कमी होतो. 

आपले केस लांब, मुलायम आणि चमकदार हवेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण कधी अनुवंशिकता तर कधी प्रदूषण आणि केमिकल्सचा अतिवापर यामुळे केसांच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. तर कधी आहारातून पुरेसे पोषण न मिळाल्याने आपले केस खूप गळतात किंवा रुक्ष होतात (Hair care Tips). अशावेळी नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही. पण मुलायम आणि चमकदार केसांमुळे आपल्या सौंदर्यात नक्कीच भर पडते. आपण आवडीने भातावर किंवा इतर पदार्थांवर घेऊन खात असलेले तूप केसांचे पोषण होण्यासाठी उपयुक्त असते. याचा अर्थ आहारात तर तूप असायलाच हवे (Use of ghee), पण केसांना तूप लावल्याने त्यांची चमक आणि मुलायमपणा वाढतो (Benefits of applying ghee to hair). आता तूप केसांना नेमके कसे लावायचे आणि त्याचे कसे फायदे होतात याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. मॉईश्चर टिकून राहण्यास मदत

तुपामुळे शरीरातील स्निग्धता वाढण्यास ज्याप्रमाणे मदत होते, त्याचप्रमाणे केसांतील मॉईश्चर चांगले ठेवायचे असेल तर केसांना तुपाने मसाज करणे फायद्याचे ठरते. आपण केसांना नियमितपणे तेल लावतोच, पण तरीही केस कोरडे आणि रुक्ष होत असतील तर तेलाऐवजी तूप लावणे फायदेशीर ठरते. तुपातील स्निग्ध घटक केसांचे पोषण करण्यास फायदेशीर ठरतात.

२. फॅटी अॅसिड

तूपामध्ये असणारे फॅटी अॅसिड केसांच्या वाढीसाठी आणि एकूणच पोषणासाठी चांगले असते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यासाठी आणि केस वरुन चमकदार दिसण्यासाठी केसांना तूपाने मसाज करणे उपयुक्त असते. 

३. केसांना चमक येण्यास मदत 

कधी प्रदूषणामुळे तर कधी विविध प्रकारच्या केमिकल्स असलेल्या उत्पादनांमुळे आपले केस कोरडे आणि रुक्ष होत जातात. तसेच अनेकदा या गोष्टींमुळे केसांत कोंडा होणे, केस गळणे अशा समस्याही उद्भवतात. पण नियमित तूप खाण्याने पोटाच्या समस्या ज्याप्रमाणे दूर होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे तूप केसांना लावल्याने केस चमकदार आणि मुलायम होतात. तसेच तूपात असलेल्या व्हीटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी मुळे केसांचा रफनेस कमी होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

४. रक्तप्रवाह सुरळीत होतो

केसांच्या मूळांना तूपाने मसाज केल्यास डोक्याच्या भागाचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे नकळत केसांची वाढ, केसांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणून केसांना आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तुपाने मसाज करावा. 

५. केस वाढीसाठी फायदेशीर 

हल्ली अनेक स्त्रिया आपले केस वाढत नाहीत या कारणामुळे व्यथित असतात. सौंदर्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या केसांची योग्य वाढ झाली नाही तर आपण निराश होतो. मात्र केसांना तुपाने मसाज केल्यास केसांची वाढ होण्यासाठी ते उपयुक्त ठरते. तूपामध्ये केसांची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक असल्याने त्याचा फायदा होतो. 
 

Web Title: Hair care Tips: Do you want shiny, soft hairs? use one, hair will be silky and shiny...Apply ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.