Lokmat Sakhi >Beauty > Hair care Tips : हेअरस्पा करून खरंच केस सुंदर होतात? सतत हेअर स्पा, योग्य की अयोग्य?

Hair care Tips : हेअरस्पा करून खरंच केस सुंदर होतात? सतत हेअर स्पा, योग्य की अयोग्य?

Hair care Tips : केस खराब झाले की हेअरस्पा करणे आता अगदी कॉमन, पण हेअर स्पा कोणी, कधी करावा याविषयी माहिती असणे आवश्यक आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 07:01 PM2022-02-16T19:01:23+5:302022-02-16T19:09:32+5:30

Hair care Tips : केस खराब झाले की हेअरस्पा करणे आता अगदी कॉमन, पण हेअर स्पा कोणी, कधी करावा याविषयी माहिती असणे आवश्यक आहे....

Hair care Tips: Does Hairspa Really Make Hair Beautiful? Continuous hair spa, right or wrong? | Hair care Tips : हेअरस्पा करून खरंच केस सुंदर होतात? सतत हेअर स्पा, योग्य की अयोग्य?

Hair care Tips : हेअरस्पा करून खरंच केस सुंदर होतात? सतत हेअर स्पा, योग्य की अयोग्य?

Highlightsएकदा हेअरस्पा केला की आपले केस लगेच छान होतील असे तुम्हाला वाटत असेल तर तसे होणार नाही. नियमितपणे हेअरस्पा केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.  केसांचे आरोग्य सुधारण्याकरता त्यावर वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करण्यापेक्षा हेअर स्पा हा पर्याय केव्हाही चांगला

केस कोरडे झाले, खूप गळायला लागले अशा समस्या आपल्याला कायम सतावत असतात. केस घनदाट आणि मुलायम असतील तर आपल्या सौंदर्यात भर पडते. पण केस खराब झाले (Hair care tips) की मात्र ते चांगले होण्यासाठी नेमके काय करायचे आपल्याला कळत नाही. अशावेळी हेअर स्पा हा केसांच्या सर्व समस्या दूर करण्याचा उत्तम उपाय आहे, असा सल्ला आपल्याला अनेकांकडून मिळतो. पण सतत हेअर स्पा (Hair Spa) करणे केसांच्या आरोग्याच्यादृष्टीने योग्य असते का? त्यासाठी होणारा खर्च आपल्याला परवडणारा असतो का? हेअर स्पा केल्याने केस खरंच मुलायम होतात का यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करुया. 

१. केस मुलायम आणि चमकदार होण्यासाठी हेअरस्पा करणे फायद्याचे ठरते. 

२. हेअर स्पा केल्यामुळे केस वाढण्यास मदत होते. केस घनदाट होण्यासाठीही हेअरस्पा करणे फायद्याचे ठरते.

३. अनेकदा आपल्या केसांची मुळे म्हणजे आपली त्वचा (स्काल्प) खराब होतो. हेअर स्पामुळे हा स्काल्प स्वच्छ होण्यास मदत होते. मुळे चांगली असतील तर केस हेल्दी राहण्यास मदत होते आणि केस चांगले राहतात. 

४. कोंडा होणे ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. तुमच्या केसांत सतत कोंडा होत असेल तर हेअर स्पामुळे हा कोंडा दूर होण्यास मदत होते. 

५. केस गळून आपल्य़ाला आता टक्कल पड़णार की काय असे आपल्याला बरेचदा वाटते. पण केसांची मुळे पक्की राहावीत आणि केस गळण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हेअर स्पा उपयुक्त ठरतो. 

६. केस कोरडे होण्याची समस्या आपल्यातील अनेकींना भेडसावते, थंडीच्या दिवसांत तर या समस्येमुळे आपण हैराण होतो. पण नियमित हेअर स्पा केला तर केसांतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. 

७. केसांना फाटे फुटण्याची समस्या भेडसावत असेल तर तुम्हाला हेअर स्पा करण्याची गरज आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. 

८. आपले केस सतत काहीही न करता तेलकट होत असतील म्हणजेच आपल्या केसांच्या त्वचेतून सतत तेल बाहेर येत असेल तर आपल्याला हेअर स्पा करायला हवा हे लक्षात घ्या. 

९. हेअर स्पामधील मसाजमुळे केसांच्या मुळाची रक्ताभिसरण क्रिया सुधारते आणि तुमचे केस वाढण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणून केस हेल्दी हवे असतील तर नियमितपणे हेअरस्पा करायला हवा. 

१०. एकदा हेअरस्पा केला की आपले केस लगेच छान होतील असे तुम्हाला वाटत असेल तर तसे होणार नाही. नियमितपणे हेअरस्पा केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.  

Web Title: Hair care Tips: Does Hairspa Really Make Hair Beautiful? Continuous hair spa, right or wrong?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.