केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. महिलांना तर केस गळायला लागले की टेन्शन येते आणि आता आपण टकले होणार की काय अशी भिती वाटायला लागते. अशावेळी जास्त चिंता न करता काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्यात असा सल्ला प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल देतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवर आंचल यांनी केस गळण्याबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्या केस गळण्याची कारणं, त्यावर सहज करता येतील असे उपाय यांबाबत माहिती देतात. केस गळणे या सामान्य तक्रारीबाबतच्या काही फॅक्टस लक्षात घेऊया (Hair Care Tips For Hair Fall Problem)...
१. तुम्हाला पूर्ण डोक्यावर केस असतील तर दररोज ८० ते १०० केस गळणं अगदी सामान्य आहे. मात्र केस गळण्याचे कारण शोधून काढणे जास्त महत्त्वाचे आहे.
२. केस गळती कमी होण्यासाठी आपल्याला हेअर ऑई, शाम्पू किंवा कंडीशनर हवा असतो. मात्र ते इतके सोपे नाही.
३. केस जास्त प्रमाणात गळतात यामागे काही नेमकी कारणे असू शकतात. शरीरात काही असंतुलन झाले तर किंवा आजारपण, ताण यांमुळेही केसगळती सुरू होते. कोणत्या व्हिटॅमिन्स आणि पोषण तत्त्वांची कमी आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे.
तुमचेही केस खूप गळतात? मग इतकेच करा..
१. रिलॅक्स व्हा, तुम्ही टकले होणार नाही.
२. केस गळती नियंत्रणात येईपर्यंत सगळ्या प्रकारच्या केमिकल ट्रीटमेंट बंद करा.
३. संतुलित आहार घ्या
४. १०० हून जास्त केस गळत असतील तर तुमच्या त्वचारोगतज्ज्ञाला दाखवा.
५. लोहाची कमतरता नाही ना आणि थायरॉईडची समस्या नाही ना हे तपासा
केस गळती केव्हा नियंत्रणात येईल?
ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर साधारणपणे ३ महिन्यांनी केस गळती नियंत्रणात येईल. पण केस गळायचे कमी झाल्याचे तुम्हाला १५ ते २० दिवसांत लक्षात येईल.
नवीन केस केव्हा येतील ?
नव्याने केस येण्याची सुरुवात साधारणपणे ६ महिन्यांनी सुरू होईल. केसांना प्रत्यक्ष मूळातून बाहेर येण्यास आणि वाढलेले केस आपल्याला दिसण्यास तेवढा किमान कालावधी लागतो. साधारणपणे ८ महिन्यांनी आपल्याला पूर्वीसारखे दाट केस दिसू शकतात.