Lokmat Sakhi >Beauty > पातळ झालेले केस होतील दाट-लांबसडक, करा फक्त २ गोष्टी; दिसाल सुंदर

पातळ झालेले केस होतील दाट-लांबसडक, करा फक्त २ गोष्टी; दिसाल सुंदर

Hair Care Tips for Hair Growth : केसांची नियमित नीट काळजी घेतल्यास त्याचा पोत चांगला राहतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 03:13 PM2023-07-31T15:13:06+5:302023-07-31T15:16:33+5:30

Hair Care Tips for Hair Growth : केसांची नियमित नीट काळजी घेतल्यास त्याचा पोत चांगला राहतो.

Hair Care Tips for Hair Growth : Thinned hair will become thick-long, just do 2 things; You look beautiful | पातळ झालेले केस होतील दाट-लांबसडक, करा फक्त २ गोष्टी; दिसाल सुंदर

पातळ झालेले केस होतील दाट-लांबसडक, करा फक्त २ गोष्टी; दिसाल सुंदर

काहीवेळा खूप गळाल्याने तर कधी केसांचा पोतच खराब झाल्याने केस एकाएकी पातळ दिसतात. इतकेच नाही तर केसांच्या मधे इतकी गॅप दिसते की चक्क टक्कल पडायला लागल्यासारखे वाटते. मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावून पाहतो तर कधी आणखी काही ना काही उपाय करतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर आपण केसांची थोडीफार काळजी घेतो, पण वेळ नसेल तर आपण ते विंचरायचेही कष्ट घेत नाही. अशाप्रकारे रुटीनमध्ये सतत बदल झाल्याने केस खराब होतात आणि त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नाही. अशावेळी केस गळायला लागतात आणि पातळ होतात. असे होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि काय करायचे याविषयी (Hair Care Tips for Hair Growth)...

१. आठवड्यातून २ वेळा मसाज

आपले केस लांब आणि दाट असावेत असं वाटत असेल तर त्याची योग्यप्रकारे काळजी घ्यायला हवी. यासाठी आठवड्यातून २ वेळा किमान केसांना तेलाने अतिशय हळूवार आणि छान पद्धतीने मसाज करायला हवा. यासाठी आपण नारळाचं तेल किंवा आवळ्याच्या तेलाचा वापर करु शकतो. या तेलांमुळे दिर्घकाळ पोषण मिळण्यास मदत होते. यासाठी केसा आधी व्यवस्थित विंचरुन घ्यावेत आणि साधारण ३० मिनीटे मसाज करावा. त्यानंतर काही वेळ हे तेल मुरु द्यावे आणि मगच शाम्पू करावा. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास केस दाट आणि जाड होण्यास मदत होते. 

२. आवळ्याचा शाम्पूचा वापर

आपण केसांना नियमितपणे शाम्पू करतो. पण बाजारात मिळणाऱ्या शाम्पूमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केलेला असतो. यामुळे केस तुटणे, रुक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. मात्र पातळ केस दाट आणि जाड करायचे असतील तर केसांसाठी आवळा वापरलेला केव्हाही चांगला. आवळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरीयल आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. हे सगळे घटक केसांसाठी फायदेशीर असल्याने केस दाट आणि मजबूत होण्यासाठी ते धुताना आवळ्याचा वापर करावा. 

Web Title: Hair Care Tips for Hair Growth : Thinned hair will become thick-long, just do 2 things; You look beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.