आपले केस लांबसडक असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं पण सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केसांची काळजी कशी घ्यावी तेच कळत नाही. केस खूपच गळतात, केसांची वाढ होत नाही अशी अनेक मुलींची तक्रार असते. (Kes Galane kase Thambvave) हे टाळण्यासाठी मुली दुकानातल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. याचा कोणताही फायदा होत नाही. (Hair Care Tips for Long and Thick Hair)
यांमुळे केसांचे नुकसान होते आणि केस जास्त प्रमाणात गळायला सुरूवात होते. (Ways to Take Care of Thick Hair) तुम्हाला तुमचे केस मजबूत ठेवायचे असतील किवा केस गळणं थांबवायचं असेल काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. रात्री झोपताना केसांची काळजी व्यवस्थित घ्यायला हवी. लांब-काळे केस हवेत असल्यास या टिप्स नक्की फॉलो करा. (Avoid this mistakes while sleeping for healthy hair)
उशीचे कापड कोणते आहे ते तपासा
रात्री खराब फॅब्रिक असलेल्या उशीवर झोपत असाल तर ही उशी आजच बदला कारण खराब उशीमुळे केस खराब होतात आणि केस कोरडे पडतात. म्हणून नेहमी सिल्क किंवा कॉटनचं कव्हर असलेल्या उशीवर झोपा. यामुळे केस तुटत नाही आणि लांबसडक राहतात.
१० रूपयांच्या कोथिंबीरीने केस होतील दाट-लांब; कंबरेपर्यंत वाढतील केस, या पद्धतीने केसांना लावा
केस विंचरून मगच झोपा
नेहमी रात्रीच्यावेळी केसांमधील गुंता सोडवून व्यवस्थित वेणी घालून मग झोपायला हवं. असं केल्यानं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. याशिवाय केस मजबूत आणि दाट होण्यास मदत होते. तुम्ही जर मोकळे केस ठेवून झोपत असाल तर याचा केसांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो.
ओले केस व्यवस्थित सुकवून घ्या
ओल्या केसांसकट कधीच झोपू नये. जर तुम्ही रात्रीच्यावेळी हेअर वॉश करत असाल तर केस नेहमी व्यवस्थित सुकू द्या. त्यानंतरच अंथरूणावर पडा. या सवयीमुळे केस चांगले राहतात. असं न केल्यास केस डॅमेज होण्याचा धोका असतो. वारंवार केस ओले ठेवल्यामुळे केसांच्या मुळांना नुकसान पोहोचते आणि केस जास्त ओलसर राहतात.
केस पिकलेत-डायने केस पुन्हा पांढरे होण्याची भिती? १ चमचा कॉफीचा उपाय-केस होतील काळे
केस घट्ट बांधून झोपू नका
रात्री झोपताना कधीही केस घट्ट बांधून ठेवू नये. नेहमी केस लूज ठेवून मगच झोपावे. जर तुम्ही खूपच घट्ट केस बांढले तर याचा स्काल्पवर परिणाम होतो आणि केस गळणं सुरू होतं. म्हणून नेहमी रात्री लूज हेअरस्टाईल करून झोपावे.