Join us  

दाट-लांबसडक केस हवेत तर वापरा किचनमधल्या २ गोष्टी; महिन्याभरात दिसेल फरक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 12:26 PM

Hair Care Tips For long And Thick Hair : किचनमध्ये सहज उपलब्ध असणारे २ पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात आणि त्याच्या वापराने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते.

ठळक मुद्देकडुलिंबामधील गुणधर्म केसांना आणि केसांच्या मूळांना विविध इनफेक्शन्सपासून दूर ठेवण्यास मदत करतात.केमिकल असलेली उत्पादने वापरण्यापेक्षा सौंदर्यासाठी घरगुती उपाय करणे केव्हाही चांगले...

आपले केस दाट आणि लांबसडक असावेत असं प्रत्येकीला वाटतं. मात्र काही ना काही कारणाने केस गळतात आणि ते दिवसेंदिवस पातळ होत जातात. एकदा केस पातळ व्हायला लागले की नेमकं काय करायचं हे आपल्याला कळत नाही. मग कधी काही घरगुती उपाय करत तर कधी पार्लरमधल्या महागड्या ट्रीटमेंटस घेत आपण केस गळणे कमी करण्याचा प्रयत्न करतो. केसांचा पोत सुधारावा यासाठी आपण बाजारात मिळणारी महागडी उत्पादनेही वापरतो. मात्र तरी आपले केस म्हणावे तितके जाड आणि लांबसडक होतीलच असे नाही. मात्र काही घरगुती उपायांनी या समस्यांवर नेमका उपाय करता येतो. किचनमध्ये सहज उपलब्ध असणारे २ पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात आणि त्याच्या वापराने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. आता हे २ पदार्थ कोणते आणि त्यांचा वापर कसा करायचा ते पाहूया (Hair Care Tips For long And Thick Hair)...

(Image : Google)

कांदा 

१. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते. ज्यामुळे केस दाट आणि चमकदार होण्यास मदत होते. 

२. कांद्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते आणि त्यामुळे केसांच्या वाढीस फायदा होतो. 

३. कांद्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस केसांमधली आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात. 

कडूनिंब

१. कडूनिंबामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्मांमुळे केसांच्या खाली असलेल्या त्वचेला विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास चांगली मदत होते. 

२. अनेकदा आपल्याला काहीठिकाणी चाई पडते त्यामुळे त्याठिकाणचे केस जावून तिथे टक्कल पडल्यासारखे दिसते. मात्र कडूनिंबामध्ये असणाऱ्या अंटीऑक्सिडंटसमुळे ही चाई भरली जाऊन त्याठिकाणी नव्याने केस येण्यास मदत होते. 

(Image : Google)

कडूनिंब आणि कांद्याचा वापर कसा करायचा? 

१. एका बाऊलमध्ये कडूनिंबाच्या पानांची पूड करुन घ्या.

२. त्यामध्ये कांद्याचा रस घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा.

३. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत चांगल्या पद्धतीने लावा. 

४. हाताने किंवा ब्रशने हे मिश्रण लावल्यानंतर १५ मिनीटे ते केसांवर तसेच राहू द्या. 

५. हलका शाम्पू आणि कंडीशनर वापरुन केस स्वच्छ धुवा.

६. हा उपाय आपण आठवड्यातून १ ते २ वेळा करु शकतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी