Lokmat Sakhi >Beauty > चिंचेची पाने आणि पांढरे केस यांचा काय संबंध? वाचा हा  सोपा- चकटफू असरदार उपाय 

चिंचेची पाने आणि पांढरे केस यांचा काय संबंध? वाचा हा  सोपा- चकटफू असरदार उपाय 

Best Home Remedies For Gray Hair: कमी वयातच केस झपाट्याने पांढरे होऊ लागले असतील, तर त्यासाठी इतर कोणतेही केमिकल्स असणारे हेअर प्रॉडक्ट वापरण्याआधी हा एक सोपा उपाय करून बघा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 01:17 PM2022-07-23T13:17:22+5:302022-07-23T13:18:04+5:30

Best Home Remedies For Gray Hair: कमी वयातच केस झपाट्याने पांढरे होऊ लागले असतील, तर त्यासाठी इतर कोणतेही केमिकल्स असणारे हेअर प्रॉडक्ट वापरण्याआधी हा एक सोपा उपाय करून बघा.. 

Hair Care Tips For White Hair: Tamarind Leaves Hair Pack For Gray Hair and Reducing Dandruff | चिंचेची पाने आणि पांढरे केस यांचा काय संबंध? वाचा हा  सोपा- चकटफू असरदार उपाय 

चिंचेची पाने आणि पांढरे केस यांचा काय संबंध? वाचा हा  सोपा- चकटफू असरदार उपाय 

Highlightsघरगुती किंवा नैसर्गिक उपाय करण्यास प्राधान्य देणार असाल, तर मग केसांसाठी चिंचेच्या पानांचा हेअरपॅक हा एक सोपा आणि अगदी स्वस्तात मस्त उपाय करून बघायला हरकत नाही.

अवघ्या विशी- पंचविशीत डोक्यात जेव्हा पांढरे केस (white or gray hair) डोकावू लागतात, तेव्हा खरोखरंच खूप वाईट वाटतं.. एखाद दुसरा केस आपण सुरुवातीला लपवून टाकतो किंवा काही जणं तर तो तोडून टाकतात. पण जेव्हा पांढऱ्या केसांचं प्रमाण वाढत जातं, तेव्हा मात्र प्रचंड अस्वस्थ होतं आणि मग हे सगळं थांबविण्यासाठी आपण केसांवर भराभर वेगवेगळे उपाय करू लागतो. केमिकल्स असणारे वेगवेगळे हेअर प्रॉडक्ट्स (hair products with chemicals) ट्राय करून तर मग केसांचं आणखीनच नुकसान होतं. म्हणूनच या समस्येसाठी घरगुती किंवा नैसर्गिक उपाय (home remedies or natural solutions) करण्यास प्राधान्य देणार असाल, तर मग केसांसाठी चिंचेच्या पानांचा हेअरपॅक (Tamarind Leaves Hair Pack) हा एक सोपा आणि अगदी स्वस्तात मस्त उपाय करून बघायला हरकत नाही.

 

केसांसाठी चिंचेच्या पानांचे फायदे (Benefits of tamarind leaves for hair)
चिंचेची हिरवीगार, कोवळी, लुसलुशीत पानं खायला देखील अगदीच छान आंबट चवीची असतात. बऱ्याच ठिकाणी या पानांची चटणी करूनही खाल्ली जाते. ही पाने आपल्या आरोग्यासाठी जशी लाभदायक आहेत, तशीच केसांसाठीही फायदेशीर आहेत. चिंचेच्या पानांमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला होणारं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. म्हणूनच डोक्यात खूप जास्त कोंडा असेल तरी त्यासाठी चिंचेच्या पानांचा हेअरपॅक वापरून बघावा. याशिवाय या पाल्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि व्हिटॅमिन्स असल्याने त्यातून केसांचे पोषण होते.

 

कसा करायचा चिंचेचा हेअरपॅक?
दोन पद्धतींनी केसांसाठी चिंचेच्या पानांचा उपयोग करता येतो. यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल, तो उपाय पांढऱ्या केसांसाठी आणि केसांतला कोंडा कमी करण्यासाठी करून बघा.

काकडीचे गारेगार आईस क्यूब, कोरड्या-निस्तेज त्वचेला मिळेल रसरशीत ताजेपणा, स्वस्त-सुरक्षित सोल्युशन 
१. पहिल्या उपायात आपण चिंचेच्या पानांचे पाणी तयार करणार आहोत. यासाठी १ ग्लास पाणी एका भांड्यात घेऊन गॅसवर तापायला ठेवा. या पाण्यात अर्धा कप चिंचेची पाने टाका. ५ ते ७ मिनिटे पाणी चांगले उकळू द्या. यानंतर कोमट झाल्यावर पाणी गाळून घ्या आणि हे पाणी केसांच्या मुळांशी लावा. एखादा तास तसेच राहू द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

 

२. हा उपाय करण्यासाठी चिंचेची पाने आणि दही यांचा हेअरपॅक करा. यासाठी अर्धा कप चिंचेची पाने मिक्सरमधून वाटून घेऊन त्याची पेस्ट करा. त्यात २ चमचे दही टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि नंतर केसांच्या मुळांशी लावा. साधारण अर्ध्या पाऊण तासांत केसांना लावलेला हा हेअरपॅक सुकून जाईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
हे दोन्ही उपाय आठवड्यातून एकदा करू शकता. काही आठवडे नियमितपणे केल्यास केस पांढरे होण्याचं प्रमाण तसेच केसांतील कोंडा दोन्हीही कमी होईल. 

 

Web Title: Hair Care Tips For White Hair: Tamarind Leaves Hair Pack For Gray Hair and Reducing Dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.