Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips : केस पटपट वाढत नाहीत? रोज सकाळी उपाशीपोटी खा ३ गोष्टी, बघा केसांवर जादू

Hair Care Tips : केस पटपट वाढत नाहीत? रोज सकाळी उपाशीपोटी खा ३ गोष्टी, बघा केसांवर जादू

Hair Care Tips : महागड्या ट्रीटमेट करण्यापेक्षा आणि महागडे शाम्पू, कंडिशनर किंवा आणखी काही उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी सोपे उपाय नक्की करुन पाहा. महिन्याभरात तुम्हाला या उपायांची जादू दिसल्याशिवाय राहणार नाही हे नक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:53 PM2022-03-07T17:53:10+5:302022-03-07T18:19:35+5:30

Hair Care Tips : महागड्या ट्रीटमेट करण्यापेक्षा आणि महागडे शाम्पू, कंडिशनर किंवा आणखी काही उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी सोपे उपाय नक्की करुन पाहा. महिन्याभरात तुम्हाला या उपायांची जादू दिसल्याशिवाय राहणार नाही हे नक्की

Hair Care Tips: Hair Doesn't Grow Fast? Eat 3 things every morning on an empty stomach, see magic on hair | Hair Care Tips : केस पटपट वाढत नाहीत? रोज सकाळी उपाशीपोटी खा ३ गोष्टी, बघा केसांवर जादू

Hair Care Tips : केस पटपट वाढत नाहीत? रोज सकाळी उपाशीपोटी खा ३ गोष्टी, बघा केसांवर जादू

Highlightsकेसगळती थांबण्याबरोबरच केसांची वाढ होण्यासाठीही सकाळी रीकाम्या पोटी नारळ पाणी पिणे उपयुक्त ठरते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा आरोग्यासाठी तसेच केसांसाठी अतिशय चांगला फायदा होतो.

आपले केस लांबसडक असावेत असे प्रत्येकीला वाटते. केस लांब असतील तर आपल्याला वेगवेगळ्या हेअरस्टाईल करता येतात आणि आपल्या सौंदर्यात भर पडते.  पण अनेक कारणांनी कित्येक तरुणींचे केस काही केल्या वाढतच नाहीत. मग वेगवेगळ्या प्रकारची तेलं लावून पाहा, तर कधी केस ट्रीम केल्यावर वाढतील म्हणून दर दोन ते तीन महिन्यांनी केस काप असे उपाय केले जातात. इतकंच नाही तर  केस वाढण्यासाठी अनेकदा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा सारख्या महागड्या ट्रीटमेंटसही घेतल्या जातात. पण आपलेही केस वाढत नसतील आणि तुम्हाला लांब केसांची हौस असेल तर काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. महागड्या ट्रीटमेट करण्यापेक्षा आणि महागडे शाम्पू, कंडिशनर किंवा आणखी काही उत्पादने वापरण्यापेक्षा घरच्या घरी सोपे उपाय नक्की करुन पाहा. महिन्याभरात तुम्हाला या उपायांची जादू दिसल्याशिवाय राहणार नाही हे नक्की

(Image : Google)
(Image : Google)

१. कडीपत्ता

कडीपत्ता औषधी असतो हे आपल्याला माहित आहे. कडीपत्त्याचा आहारात आवर्जून समावेश करावा असेही आहारतज्ज्ञ अनेकदा सांगताना दिसतात. कडीपत्ता हा बाजारात सहज उपलब्ध असणारा घटक असल्याने हा उपाय करणे तुलनेने सोपे आहे. भाजी, आमटी किंवा कढी आणि इतर पदार्थांना स्वाद आणण्यासाठी वापरला जाणारा कडीपत्ता सौंदर्य खुलवण्यासही मदत करतो. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कडीपत्त्याची ३ ते ४ पाने चावून खाल्ल्यास त्याचा केस वाढीसाठी चांगला फायदा होतो. कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियमसारखे पोषक घटक असल्याने कडीपत्ता खाणे आरोग्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरते. 

२. जवस 

जवसामध्ये ओमेगा ३ जास्त प्रमाणात असल्याने आरोग्याबरोबरच केसांचे पोषण होण्यासाठी जवस फायदेशीर ठरतात. जवस थोडे भाजून त्याची पावडर करावी आणि सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात एक किंवा दोन चमचे पावडर घालून ते पाणी प्यावे. केस वाढविण्याबरोबरच केस हेल्दी ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

३. कडुलिंब 

कडूलिंबाची पाने आपल्याकडे साधारणपणे वसंत ऋतूमध्ये म्हणजेच चैत्र पाडव्याला खाण्याची पद्धत आहे. कडूलिंब खाल्ल्याने उन्हाळ्यातील आजारांपासून आपला बचाव होतो. तसेच कडुलिंबाची पाने त्वचेच्या समस्यांवरही अतिशय उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा आरोग्यासाठी तसेच केसांसाठी अतिशय चांगला फायदा होतो. सकाळी रीकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. नारळपाणी 

नारळपाणी हे एक पोषक पेय असून लहान मुलांपासून ते आजारी व्यक्तींपर्यंत सर्वांना नारळ पाणी दिले जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठी तसेच ऊर्जा वाढविण्यासाठी नारळ पाण्याचा उपयोग होतो. त्वचा आणि केस चांगले होण्यासाठी नारळ आणि नारळाचे पाणी अतिशय फायदेशीर ठरते. जास्त प्रमाणात केसगळती होत असेल तर नारळाचे पाणी आवर्जून प्यायला हवे. केसगळती थांबण्याबरोबरच केसांची वाढ होण्यासाठीही सकाळी रीकाम्या पोटी नारळ पाणी पिणे उपयुक्त ठरते. 

Web Title: Hair Care Tips: Hair Doesn't Grow Fast? Eat 3 things every morning on an empty stomach, see magic on hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.