केस लांबसडक असले तर आपण जास्त छान दिसतो. इतकेच नाही तर लांबसडक केसांच्या आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईलही करता येतात. मुलींचे सौंदर्य त्यांच्या केसांत असते असे म्हणतात. पूर्वीच्या काळी लग्न करताना मुलीचे केस किती लांबसडक आहेत हे आवर्जून पाहिले जायचे. काळाच्या ओघात हे मागे पडले असले तरी आपले केस लांब असावेत असे आजही बहुतांश स्त्रियांना वाटते (Hair Care Tips). केस वाढावेत यासाठी आपण अनेकदा काही ना काही प्रयत्न करताना दिसतो, मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. केस वाढण्यामागे आपल्या शरीराचे होणारे पोषण, केसांची योग्य पद्धतीने राखलेली निगा, केसांसाठी वापरण्यात येणारी उत्पादने अशी अनेक कारणे असतात. केस भरभर चांगले दाट वाढावेत यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे, त्या कोणत्या पाहूया...
१. केसांची मुळे साफ ठेवणे
केसांची चांगली वाढ व्हावी असे वाटत असेल तर केसांची मुळे साफ ठेवा. यासाठी ठराविक दिवसांनी केस धुणे आवश्यक आहे. शाम्पू करताना केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे याठिकाणचे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते आणि केस वाढतात. यामुळे केसांना आवश्यक घटक तर मिळतातच पण ऑक्सिजन केसांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
२. डाएटकडे लक्ष द्या
केसांची वाढ चांगली व्हायची असेल तर आहारही चांगला असायला हवा. आहारात कोलेजन आणि बॉटोटीन हे घटक अवश्य असायला हवेत. केसांच्या वाढीसाठी हे दोन्हीही घटक उपयुक्त असल्याने त्यांचा आहारात समावेश केल्यास निश्चितच फायदा होतो. यासाठी आहारात भाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यांचा पुरेशा प्रमाणात समावेश असायला हवा.
३. केस मॉईश्चराइज राहतील असे बघा
केसांची वाढ चांगली होण्यासाठी केसांतील कोरडेपणा दूर करायला हवा. त्यामुळे केस धुण्याआधी केसांना भरपूर तेलाने मसाज करावा. यामुळे केस कोरडे न होता त्यातील मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते. केसांना सतत ब्लो ड्राय, आयर्निंग अशा ट्रीटमेंटस घेतल्या तरी केसांचा कोरडेपणा वाढतो, त्यामुळे केसांतील मॉईश्चर कमी होत जाते. त्यामुळे शक्यतो या ट्रिटमेंटस टाळलेल्याच बऱ्या.
४. केस ट्रिम करायला हवेत
ठराविक वेळाने केस ट्रीम केले तर ते वाढण्यास मदत होते. केसांच्या मुळांशी मसाज केल्य़ानेही केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. केसांच्या टोकांपर्यंत पुरेसे पोषण मिळत नाही त्यामुळे ते निर्जीव होतात. असे केस दिर्घकाळ तसेच राहीले तर केसांची वाढ खुंटते. मात्र नियमीत केस ट्रीम करत राहिल्यास केस चांगले वाढतात.
५. केस विंचरताना काळजी घ्या
केस विंचरताना हळूवारपणे त्यातील गुंता काढायला हवा. अनेकदा घाईत आपण जोरजोरात केस विंचरतो. मात्र त्यामुळे केस तुटण्याची किंवा त्यांच्या मुळांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. तसेच यामुळे केसांची वाढही रोखली जाऊ शकते. याबरोबरच केस खूप घट्ट बांधल्यानेही केसांची वाढ खुंटते. त्यामुळे केस हळूवार विंचरुन हळूवार बांधायला हवेत.