केस अकाली पांढरे (gray hair) होणे, केस गळती, केसांची वाढ न होणे किंवा केसांना फाटे फुटून केस कोरडे, रुक्ष दिसणे (dry hair) अशा केसांबाबत अनेक समस्यांवरचा एक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय म्हणजे जास्वंद.. जास्वंदाचं फुल आणि जास्वंदाची (jaswand) पानं हे दोन्हीही केसांसाठी अतिशय पोषक आहेत. पण तरीही अनेकदा आपण हे घरगुती उपचार सोडून देतो आणि केसांसंदर्भात असणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यावर रसायनांचा मारा करत बसतो...(home hacks for hair growth)
याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे अशा पद्धतीचे नैसर्गिक उपचार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. म्हणूनच अगदी झटपट होणारा आणि तेवढाच परिणामकारक ठरणारा उपाय आपण शोधत असतो.. हा उपाय त्यापैकीच एक आहे.. जास्वंदाचं फुलं आणि त्याची पानं घेऊन घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने हे कंडिशनर तयार करा आणि दर आठवड्याला त्याचा वापर करा. अगदी दोन- तीन वेळा वापरल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. केस तर चमकदार, मऊ होतीलच पण त्यांची वाढही फास्ट होईल. जास्वंदापासून अगदी सोप्या पद्धतीने कंडिशनर कसे तयार करायचे, याविषयीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या hairgrowth.fast या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
केसांसाठी जास्वंद अतिशय फायदेशीर...(benefits of hibiscus fflower for hair)
- जास्वंदामध्ये असणारं अमिनो ॲसिड केसांसाठी अतिशय पोषक आहे. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
- जास्वंदामध्ये असणारं फॉस्फरस आणि कॅल्शियम केसांना मजबूती देतं.
- व्हिटॅमिन सी मुळे केसांची मुळे बळकट हाेण्यास मदत होते. तसेच केसांतील कोंडा कमी होतो.
- जास्वंदाच्या पानात असणाऱ्या केरोटीनमुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होते.
जास्वंदापासून कसं करायचं कंडिशनर
how to make conditioner from hibiscus flower?
- हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या.
- या पाण्यात जास्वंदाचे 2 फुलं आणि १० ते १२ पाने यांचे बारीक बारीक तुकडे करून टाका.
- हे मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या.
- नंतर हाताने जास्वंदाची पाने आणि फुलं कुस्करा..
- आता हे मिश्रण जरा घट्ट झाल्यासारखे जाणवेल. ते गाळून घ्या आणि गाळून घेतलेलं पाणी केस धुतल्यानंतर कंडिशनर म्हणून वापरा.