Join us  

Hair Care Tips: केस खूप गळतात, पांढरे झाले? शाम्पू सोडा आणि हे प्रभावी हर्बल वॉटर वापरून पाहा जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 12:01 PM

Hair Fall And Gray Hair: केस धुण्यासाठी आता शाम्पूऐवजी हर्बल वॉटर वापरण्याचा ट्रेण्ड आहे.. हर्बल वॉटर (herbal water) म्हणजे नेमकं काय आणि ते घरच्याघरी कसं तयार करता येतं, याविषयी ही सविस्तर माहिती..

ठळक मुद्देकेसांच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी आता केस धुण्यासाठी हर्बल वॉटर वापरण्याचा ट्रेण्ड आला आहे.

केस गळणं, (hair fall) केसांमध्ये वारंवार कोंडा होणं (dandruff), कमी वयातच खूप केस पांढरे होणं (gray hair), केसांना वारंवार फाटे फुटणं असा त्रास आता खूप जणींना जाणवतो. केस धुण्यासाठी आपण शाम्पू वापरतो, कंडिशनल लावतो. बऱ्याचदा हे सगळे रासायनिक पदार्थ आपल्या केसांना, डोक्याच्या त्वचेला सहन होत नाहीत. त्यामुळे मग त्याचा दिवसेंदिवस केसांवर वाईट परिणाम होत जातो आणि त्यामुळेच मग केसांच्या वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. हा त्रास कमी करण्यासाठी आता केस धुण्यासाठी हर्बल वॉटर वापरण्याचा ट्रेण्ड आला आहे. (use of herbal water for hair wash)

 

हर्बल वॉटर म्हणजे काय?नावातूनच लक्षात येतं की हर्बल म्हणजे हे काहीतरी नैसर्गिक आहे.. हे नैसर्गिक पद्धतीचे हेअर वॉश वॉटर घरच्याघरी तयार करणं अगदी सोपं आहे. अजूनही काही वयस्कर महिला केस धुण्यासाठी शिकेकाईचा वापर करतात. ही शिकेकाई हे सुद्धा एक हर्बल वॉटरचेच उदाहरण आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांपासून केस धुण्यासाठी हर्बल रसायन तयार करणे म्हणजे हर्बल वॉटर. 

 

हर्बल वॉटरचे वेगवेगळे प्रकार (Types of herbal water)१. रिठा आणि आवळारिठा आणि आवळा या दोन्ही गोष्टी केसांसाठी पोषक आहेत. केस खूप गळत असतील किंवा अकाली पांढरे झाले असतील तर हा उपाय त्यावर उत्तम ठरू शकतो. हा उपाय करण्यासाठी पाणी गरम करायला गॅसवर ठेवा. त्यामध्ये रिठा आणि आवळा टाका. ५ ते १० मिनिटे पाणी उकळू द्या. त्यानंतर गॅसबंद करा आणि पाण्यावर झाकण ठेवा. रात्रभर आवळा आणि रिठा गरम पाण्यात भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि त्याचा केस धुण्यासाठी वापर करा. केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होईल. 

 

२. कांदा आणि जास्वंदया दोन्ही पदार्थांचा एकत्रित वापर केस धुण्यासाठी करता येतो. यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्या तसेच जास्वंदाची २ ते ३ फुलं आणि ४ ते ५ पानं हातानेच चुरून घ्या. एका पातेल्यात एक- दोन लीटर पाणी उकळायला ठेवा. त्यामध्ये चिरलेला कांदा आणि जास्वंदाची फुलं- पानं टाका. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. त्यावर झाकण ठेवा आणि साधारण अर्ध्या तासाने हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. 

 

३. कढीपत्ता आणि लिंबू हे देखील तुमच्या केसांसाठी एक उत्तम हर्बल वॉटर ठरू शकतं. यासाठी कढीपत्त्याची १५- २० पाने मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या. उकळलेल्या पाण्यात हा लेप टाका आणि आणखी उकळू द्या. त्यानंतर पाणी कोमट झाले की त्यात लिंबाचा रस टाका आणि केस धुण्यासाठी या पाण्याचा वापर करा. 

 

केसांसाठी हर्बल कंडिशनरकेसांसाठी घरच्याघरी कंडीशनर तयार करणंही सोपं आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा जवस टाका आणि पाणी उकळायला ठेवा. जेव्हा पाण्यात चिकटपणा जाणवू लागेल, तेव्हा गॅस बंद करा. काेमट झाल्यानंतर हे पाणी केसांसाठी कंडिशनर म्हणून वापरा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय