Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips: घरात आलं आणि दही आहे? केस झटपट वाढविण्यासाठी हा घ्या सोपा पर्याय, केस वाढतील भरभर

Hair Care Tips: घरात आलं आणि दही आहे? केस झटपट वाढविण्यासाठी हा घ्या सोपा पर्याय, केस वाढतील भरभर

Home Remedies For Hair Growth: केस एवढे हळू- हळू वाढतात की जणू काही त्यांची वाढ खुंटली आहे.. कित्येक दिवसांत ते वाढलेलेच नाहीत, असं वाटतं. असं तुमचंही झालं असेल तर काही दिवस नियमितपणे हे घरगुती उपाय करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 02:07 PM2022-04-19T14:07:25+5:302022-04-19T14:08:03+5:30

Home Remedies For Hair Growth: केस एवढे हळू- हळू वाढतात की जणू काही त्यांची वाढ खुंटली आहे.. कित्येक दिवसांत ते वाढलेलेच नाहीत, असं वाटतं. असं तुमचंही झालं असेल तर काही दिवस नियमितपणे हे घरगुती उपाय करून बघा..

Hair Care Tips: Home remedies for hair growth, hair will become long and strong | Hair Care Tips: घरात आलं आणि दही आहे? केस झटपट वाढविण्यासाठी हा घ्या सोपा पर्याय, केस वाढतील भरभर

Hair Care Tips: घरात आलं आणि दही आहे? केस झटपट वाढविण्यासाठी हा घ्या सोपा पर्याय, केस वाढतील भरभर

Highlightsइतर महागडे उपाय सोडा आणि काही दिवस केसांसाठी हे घरगुती उपाय करून बघा.

आपल्या काही मैत्रिणींचे, बहिणींचे केस असे असतात की त्यांनी कापले की लगेच सरसर वाढतात. कापल्यानंतर अगदी दोन- तीन महिन्यांतच त्यांच्या केसांची छान वाढ (hair growth) झालेली दिसून येते. त्याउलट आपले केस. कापल्यानंतर अगदीच हळूहळू वाढतात. २- ३ महिने उलटून गेले तरी त्यांच्यातली वाढ दिसून येत नाही. मग लांबसडक केस होण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार की काय असं वाटू लागतं. केसांच्या अशा समस्या असणाऱ्या सगळ्या मैत्रिणींसाठी हा एक सोपा घरगुती उपाय...(home hacks)


केसांची झटपट वाढ होण्यासाठी काय करावं, याविषयीच्या टिप्स इन्स्टाग्रामच्या healthis_care या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत. आलं (ginger), दही, मध, खोबरेल तेल असे आपल्या घरात अगदी सहज सापडणारे पदार्थ वापरूनही केसांची चांगली आणि भराभर वाढ होऊ शकते, असं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. हे सगळे पदार्थ आपल्या रोजच्या वापरातील आहेत, त्यामुळे ते केसांसाठी हानिकारक नाहीत. शिवाय ते आपल्या घरातच असल्याने त्यांच्यासाठी विशेष पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. त्यामुळेच तर इतर महागडे उपाय सोडा आणि काही दिवस केसांसाठी हे घरगुती उपाय करून बघा. हा उपाय करताना तुम्ही जेवढे नियमित असाल, तेवढी तुमच्या केसांची वाढ अधिक जोमाने होईल.


केसांची वाढ होण्यासाठी घरगुती उपाय (home hacks for hair growth)
१. ४ टीस्पून खोबरेल तेल, ४ टीस्पून आल्याचा रस आणि ४ टीस्पून कोरफडीचा गर हे सगळं साहित्य एका वाटीत एकत्र करा. बोटांच्या टोकांचा उपयोग करून अलगद केसांच्या मुळांशी लावा. एक ते दिड तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
२. एक कप दही, ४ टीस्पून मध आणि २ टीस्पून मेथीच्या दाण्यांची पावडर हे सगळे साहित्या एका बाऊलमध्ये एकत्र करा. व्यवस्थित कालवून घेतला की हा लेप केसांच्या मुळाशी लावा. एक ते दिड तासाने केस धुवून घ्या.


केसांसाठी आल्याचे फायदे
- आल्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी इन्फ्लेमेटरी घटक असतात. 
- आल्याचा लेप डोक्याच्या त्वचेला लावल्याने तेथील रक्तप्रवाह सुरळीत आणि वेगवान होतो. त्यामुळे केसांची मुळे पक्की होऊन त्यांची वाढही चांगली होते. 

 

Web Title: Hair Care Tips: Home remedies for hair growth, hair will become long and strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.