Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ झाले, जराही वाढ नाहीये? ५ मिनिटांत घरीच हा शॅम्पू बनवा; भराभर वाढतील केस

केस पातळ झाले, जराही वाढ नाहीये? ५ मिनिटांत घरीच हा शॅम्पू बनवा; भराभर वाढतील केस

Hair Care Tips : स्वयंपाकघरातील काही पदार्थ केस गळणं  रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 01:54 PM2023-06-23T13:54:21+5:302023-06-23T16:52:56+5:30

Hair Care Tips : स्वयंपाकघरातील काही पदार्थ केस गळणं  रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Hair Care Tips :Homemade shampoo for healthy, long hairs | केस पातळ झाले, जराही वाढ नाहीये? ५ मिनिटांत घरीच हा शॅम्पू बनवा; भराभर वाढतील केस

केस पातळ झाले, जराही वाढ नाहीये? ५ मिनिटांत घरीच हा शॅम्पू बनवा; भराभर वाढतील केस

स्वंयपाकघरातील काही पदार्थ  खाण्याबरोबरच सौंदर्य उत्पादनांमध्येही वापरले जातात. मेथी कंबरेसाठी उत्तम मानली जाते. (Hair Care Tips)  उर्जा मिळण्यासाठी आणि हाडांची झीज भरून काढण्यासाठी मेथी गुणकारी ठरते. मेथीचे दाणे केसांसाठीही गुणकारी ठरतात. केस गळण्याची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना उद्भवते. (How to prevent Hair loss)

स्वयंपाकघरातील काही पदार्थ केस गळणं  रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चहा पावडर, मेथीचे दाणे घालून हे पाणी उकळवा. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. नंतर या पाण्यात कोणताही सौम्य शॅम्पू मिसळून या पाण्यानं स्वच्छ केस धुवून घ्या.  (Homemade shampoo for healthy, long hairs)

केसांच्या प्रकारानुसार शॅम्पूची निवड कशी करावी?

केसांच्या प्रकारासाठी वेगवेगळे शॅम्पू बनवले जातात, त्यामुळे तुमच्या केसांसाठी शॅम्पू खरेदी करताना तुमच्या केसांच्या प्रकाराविषयी योग्य माहिती असली पाहिजे. तुमचे केस कोरडे आहेत आणि तुम्ही केस धुण्यासाठी मॉइश्चरायझ शॅम्पूचा वापर केला नाही तर ते तुमच्या केसांची गुणवत्ता खराब होते. कोरडे केस, तेलकट केस, बारीक केस, कलर ट्रिट केलेले केस यासाठी वेगवेगळे शॅम्पू वापरावेत. 

जड रसायने असलेले शॅम्पू काही वेळा केसांसाठी हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे शॅम्पूच्या घटकांचीही काळजी घ्या. जर तुमचे केस तेलकट असतील तर ते शॅम्पू घ्या ज्याच्या लेबलवर वॉल्यूमाइजिंग, स्ट्राँगिंग, बॅलन्सिंग लिहिलेले आहे. जर तुमचे केस कोरडे असतील तर ते शॅम्पू घ्या ज्याच्या लेबलवर स्मूथिंग, हायड्रेटिंग असे शब्द लिहिलेले आहे.

पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर

पेराबीन देखील हानिकारक मानले जाते. बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी ते सौंदर्यप्रसाधने आणि शॅम्पूमध्ये संरक्षक म्हणून वापरले जातात. पेराबीनमुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. शॅम्पूनं केस धुतल्यानंतर  कंडिशनर तुमच्या टाळूला लावणे टाळा. त्याऐवजी, केसांच्या मध्यभागी आणि टोकांवर लक्ष केंद्रित करा.  शेवटी केस पाण्यानं स्वच्छ धुवा.

Web Title: Hair Care Tips :Homemade shampoo for healthy, long hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.