Join us  

केस खूप पिकलेत, डाय नको वाटतो?  या ट्रिकनं घरगुती डाय लावा; कायम केस राहतील काळेभोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 10:33 AM

How to get  black hairs naturally homemade dye for black hairs : केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरावा

केस पांढरे होण्याची समस्या साधारण तिशी-चाळीशीच्या वयात उद्भवते.  एकदा केस पांढरे व्हायला सुरूवात झाली की आयुष्यभर पांढऱ्या केसांची वाढ होत राहते. काहीजणांना केमिकल्सच्या वापरामुळे, हार्मोनल बदलांमुळे तर काहीजणांना कौटुबिंक इतिहास असल्यानं कमी वयातच केस पिकण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. (Hair Care Tips) 

केस पिकायला लागल्यानंतर मेहेंदी किंवा डाय लावून केस काळे किंवा तुम्हाला हव्या त्या रंगाचे करता येतात. पण डाय केले किंवा ग्लोबल कलर केलं तर वारंवार केस पांढरे पडतील अशी भिती अनेकांच्या मनात असते. घरच्याघरी  मेहेंदी लावताना कोणती काळजी घ्यायची ज्यामुळे केस काळेभोर राहतील ते पाहूया. (How to get  black hairs naturally)

केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही घरगुती हेअर मास्क वापरावा. तुमच्या खाण्यापिण्याकडेही विशेष लक्ष द्यावे. काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात. तुमच्या आहारात कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न अशा गोष्टींचा समावेश करावा. तुम्ही केसांना मेहेंदी लावू शकता. हे लावल्याने तुमच्या केसांना चमक तर मिळेलच पण केस मऊ होतील. केसांवर फक्त नैसर्गिक गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स