Join us  

डोक्यावर केस विरळ, टक्कलच जास्त दिसतं? ५ रुपयांच्या कढीपत्त्याचा खास उपाय- केस होतील दाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:08 PM

Hair Care Tips : केस वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत पारंपारीक आणि सुरक्षित मानला जातो.

लांब, काळे, दाट केस प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. आजकाल ऊन, धूळ, चुकीची लाईफस्टाईल यांमुळे केस गळतीची त्रास वाढला आहे. (Hair Care Tips)  केसांमधील हानीकारक केमिकल्स नुकसानकारक ठरतात. अशा स्थितीत काही घरगुती उपाय करून तुम्ही केस गळतीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता. जुन्या काळात लोकांचे केस खूपच सुंदर असायचे आता तसे केस पाहायला मिळत नाहीत. ( How To Grow Hairs Naturally Hair Growth Tips) काही सोपे उपाय करून तुम्ही गळणाऱ्या केसांपासून सुटका मिळवू शकता. केस वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत पारंपारीक आणि सुरक्षित मानला जातो.  (How To Grow Hairs Naturally)

साहित्य

पाणी - २ चमचे

मेथी दाणे - 2 चमचे

कढीपत्ता - १ वाटी

कोरफड - 1 वाटी चिरून

मेथीचे पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांडे घेऊन त्यात २ ग्लास पाणी घालून गॅसवर मध्यम आचेवर गरम करावे. यानंतर पाण्यात मेथी दाणे, कढीपत्ता आणि कोरफड मिसळा आणि चांगले शिजवा. कढईतील पाणी अर्धे होईपर्यंत सर्व गोष्टी पाण्यात शिजवा. आता हे पाणी एका भांड्यात गाळून घ्या आणि भांड्यात ठेवा आणि सामान्य तापमानावर येऊ द्या. मेथीचे पाणी तयार आहे.

त्याचा वापर कसा करायचा याबद्दल तुम्हाला संभ्रम असेल तर हे अगदी सोपे आहे, पाणी थंड झाल्यावर तुमच्या आवडीच्या शॅम्पूचे पॅकेट किंवा 1 चमचा शॅम्पू भांड्यात घालून चांगले मिसळा. नंतर आंघोळ करताना केसांमध्ये हे पाणी घाला. या पाण्याने केसांना ५ मिनिटे मसाज करा आणि नंतर फेस आल्यावर केस धुवा. २ आठवडे हा उपाय केल्यास केसांची लांबी चांगली वाढेल आणि केस गळणंही थांबेल आणि केस दाट होतील. केसांना ड्रायर वारंवार लावू नका, केस फक्त शॅम्पूने न धुता कंडिशनरने धुवा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यब्यूटी टिप्सकेसांची काळजी