केस विंचरताना आणि धुताना खूप तुटतात अशी अनेकींची तक्रार असते. केस कमकुवत झाले की कोरडे पडतात आणि तुटायला सुरूवात होते. महिनोंमहिने केसांना योग्य पोषण न मिळाल्यास केसांची अवस्था खूपच खराब होते. केस गळणं थांबवण्यासाठी लोक महागडे स्पा, केरेटिन ट्रिटमेंट्स घेतात पण याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. (How to growth hairs faster)
केसांच्या वाढीसाठी हेअर सिरम कसे बनवावे?
केस गळणं थांबवण्यासाठी सगळ्यात आधी १ ग्लास पाण्यात चमचाभर तांदूळ शिजवण्यासाठी ठेवा. त्यात चमचाभर मेथीचे दाणे घाला. हे पाणी व्यवस्थित उकळून घ्या. फ्रेश एलोवेरा घेऊन एका प्लेटमध्ये पल्प काढून घ्या. हा पल्प पाण्यात घालून उकळू द्या. नंतर गॅस बंद करा. नंतर साध्या पाण्यानं केस धुवून टाका. आठवड्यातून २ दिवस हा उपाय केल्यास केस भराभर वाढण्यास मदत होईल. (How to Make Your Hair Grow Faster and Stronger)
एलोवेरा आणि आवळा
एलोवेरा आणि आवळा यात दोन्ही पदार्थांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. जे केसांसाठी प्रभावी ठरतात. यामुळे तुम्ही लांब केस मिळवू शकता. आवळ्याचा रस एलोवेरा जेलमध्ये मिसळून २० मिनिटांसाठी केसांन लावा आणि नंतर केस स्वच्छ धुवून टाका. या घरगुती उपायांनी केस मजबूत होण्यास मदत होईल.
किचनमधली बारीक झुरळं कमीच होत नाहीत? ३ सोपे उपाय, घरात एकही झुरळ दिसणार नाही
एलोवेरा आणि जोजोबा तेल
केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा थेट वापरही करता येतो. तुम्हाला फक्त कोरफडीचे ताजे पान घ्यायचे आहे आणि ते मधोमध कापायचे आहे. आता पानाचा आतील भाग म्हणजेच जेल तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावावे लागेल. कोरफडीपासून बनवलेला नैसर्गिक हेअर मास्क देखील तुम्हाला लांब आणि चमकदार केस देऊ शकतो.
महिन्याभरात झरझर घटेल वजन; तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा अस्सल उपाय, दिसाल स्लिम
हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेलमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळावा लागेल. याशिवाय जोजोबा तेल आणि मेथीच्या दाण्यांमध्ये थोडासा मध मिसळून केसांना लावा. त्यानंतर तासभर ठेवल्यानंतर केस शॅम्पूने धुवा. हा उपाय केस जलद वाढण्यास मदत करेल