Lokmat Sakhi >Beauty > स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा...

स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा...

Hair Care Tips: केस खूप गळत असतील, केसांची वाढ व्यवस्थित होत नसेल तर बाकीचे सगळे कॉस्मेटिक्स सोडा आणि हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(How to reduce hair fall)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 11:58 AM2023-11-20T11:58:04+5:302023-11-20T11:58:46+5:30

Hair Care Tips: केस खूप गळत असतील, केसांची वाढ व्यवस्थित होत नसेल तर बाकीचे सगळे कॉस्मेटिक्स सोडा आणि हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(How to reduce hair fall)

Hair care tips, How to reduce hair fall, How to use ginger to reduce hair loss, Benefits of ginger for hair, Home remedies for dandruff | स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा...

स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा...

Highlightsआठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास अगदी १५ दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल..

हल्ली केस गळण्याची समस्या खूपच वाढली आहे. त्यातही आता हिवाळा सुरू झाला म्हटल्यावर केस गळण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढतं. कारण या दिवसांत त्वचा कोरडी पडल्याने केसांमध्ये खूप कोंडा होतो आणि डोक्यातला कोंडा वाढला की केस जास्त गळतात. त्यामुळे आता केस गळणं आणि डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने केसांची चांगली वाढ होण्यासही मदत होईल. यासाठी आपल्याला आल्याचा वापर करायचा आहे (How to use ginger to reduce hair loss). त्यामुळे आलं नेहमी स्वयंपाकातच नाही तर कधी कधी केसांसाठीही वापरून पाहा (Benefits of ginger for hair). नियमितपणे उपाय केल्यास अगदी १५ दिवसांतच केसांचं गळणं खूप कमी होईल.(home remedies for dandruff) 

 

केसांसाठी आलं वापरण्याचे फायदे

१. आल्यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक हे दोन पदार्थ असतात. ते केसांच्या वाढीसाठी पोषक आहेत.

२. आल्यामध्ये झिंक असल्याने ते डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. 

विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी

३. आल्यामध्ये जिंजरोल हा घटक असतो. तो घटक त्वचेतलं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. त्वचेतलं रक्ताभिसरण सुधारलं की केसांच्या वाढीसाठी मदत होते.

४. आल्यामध्ये असणारं सिलिकॉन केसांच्या वाढीसाठी मदत करते.

 

केस गळणं कमी करण्यासाठी आल्याचा वापर कसा करायचा?

हा उपाय इन्स्टाग्रामच्या beauty.and.diy06 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला आलं, ॲलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे ३ पदार्थ लागणार आहेत.

कुंडीतल्या मातीचा कस वाढविणारे ३ पदार्थ, माती बदलण्याची गरज नाही- बाग नेहमीच सदाबहार राहील

सगळ्यात आधी आल्याच्या साली काढून घ्या आणि किसून घेऊन त्याचा रस काढून घ्या.

एका वाटीत आल्याचा रस २ टेबलस्पून घ्या, त्यात १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल टाका. आणि १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका.
 
हे सगळं मिश्रण एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी लावा.

अर्धा ते पाऊण तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 

आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास अगदी १५ दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

Web Title: Hair care tips, How to reduce hair fall, How to use ginger to reduce hair loss, Benefits of ginger for hair, Home remedies for dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.