Lokmat Sakhi >Beauty > केस धुतले की भराभर तुटतात? अर्धा चमचा मेथीच्या दाण्यांचा 'असा' वापर करा, लांब केस मिळवा

केस धुतले की भराभर तुटतात? अर्धा चमचा मेथीच्या दाण्यांचा 'असा' वापर करा, लांब केस मिळवा

Hair Care Tips : मेथीत फायबर्स, प्रोटीन्स, कार्ब्स, फॅट, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:19 PM2024-10-08T22:19:04+5:302024-10-09T18:31:47+5:30

Hair Care Tips : मेथीत फायबर्स, प्रोटीन्स, कार्ब्स, फॅट, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.

Hair Care Tips : How To Use Fenufreek For Hair Care Fenugreek Benefits For Hairs | केस धुतले की भराभर तुटतात? अर्धा चमचा मेथीच्या दाण्यांचा 'असा' वापर करा, लांब केस मिळवा

केस धुतले की भराभर तुटतात? अर्धा चमचा मेथीच्या दाण्यांचा 'असा' वापर करा, लांब केस मिळवा

केसांसाठी मेथी अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. आयुर्वेदात मेथीचे अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण याच्या सेवनाने केसांचा विकास होण्यास मदत होते. (Hair Care Tips) मेथीत फायबर्स, प्रोटीन्स, कार्ब्स, फॅट, आयर्न आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केसांचे गळणं कमी होतं. गळणाऱ्या केसांसाठी मेथी फायदेशीर ठरते. (Hair Growth Solution) 

शरीरात आयर्नची कमतरता असल्यास केस वेगानं गळतात. (How To Get Long Hairs Naturally) तुमचे केस गळत असतील तर आहारात आयर्नचे प्रमाण वाढवायला हवे, ज्यामुळे केस गळणं कमी होतं. मेथीच्या वापरानं केस चांगले राहतात समजून घेऊया. (How To Use Fenugreek For Hair Care Fenugreek Benefits For Hairs)

हेल्दी केसांसाठी मेथीचा असा वापर करा

1) मेथीचे पाणी- केसांसाठी मेथीचे पाणी फायदेशीर ठरते कारण मेथीच्या बीया मेंदूतील रक्त प्रवाहास प्रोत्साहन देतात आणि केस वेगानं वाढण्यास मदत होते. केसांच्या मुळांना पोषण मिळते. यात एंटीऑक्सिडेंट्स आणि एंटी इफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे कोंडा, स्काल्पची जळजळ आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते. 

जगात ‘तिचे’ केस ठरले सर्वात लांब-पाहा सुंदर केसांचं सिक्रेट-दाट केसांसाठी 'हा' पदार्थ लावतात

2) मेथीचे सिरम- केसांसाठी मेथीचे सिरम फायदेशीर ठरते. हे लावल्यानंतर केस वाढवण्यास मदत होते.  हे सिरम आपल्या केसांना सिल्की बनवते आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. 

3) मेथीचे तेल- केसांना मेथीचे तेल कसं लावावं हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण  हा केसांना दाट बनवण्याचा रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्ही मोहोरीच्या तेलात किंवा नारळाच्या तेलात मेथी शिजवून घ्या. नंतर केसांच्या मुळांना लावा. यातील बायोएक्टिव्ह एंजाईम्समुळे केसांची ग्रोथ होण्यास मदत होते. 

दसऱ्याला दारासमोर सुंदर रांगोळ्या; ५ मिनिटांत काढून होईल सुबक-सुंदर डिझाइन्स

4) मेथी हेअर मास्क - मेथी बारीक वाटून घ्या त्यात एलोवेरा जेल मिसळा नंतर आपल्या केसांना लावा. ज्यामुळे तुमचे केस हेल्दी राहतील आणि केसांचं टेक्चरसुद्धा सुधारेल.

Web Title: Hair Care Tips : How To Use Fenufreek For Hair Care Fenugreek Benefits For Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.