केस लांबसडक, मुलायम होण्यासाठी आपण सतत काही ना काही करत असतो. कधी शाम्पू बदलून बघ तर कधी हेअर मास्क लावून बघ असे प्रयोग आपण नियमित करतो. इतकेच नाही तर केस छान दिसावेत म्हणून आपण कधी पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करतो तर कधी हेड मसाज घेतो. तेल लावल्याने केसांना चांगले पोषण मिळते आणि केसांच्या वाढीसाठी आणि ते दाट होण्यासाठी त्याचा फायदा होतो. केसांना अमुक तेल लावल्याने केस वाढतील किंवा काळेभोर होतील असे ऐकून आपण जास्वंदीचे तेल, भृंगराज तेल, आवळ्याचे तेल असे काही ना काही ट्राय करत असतो. याबरोबरच आपण जेवणाला स्वाद येण्यासाठी किंवा उन्हाळ्यात तब्येत चांगली राहण्यासाठी जो कांदा खातो तो कांदाही केसांसाठी अतिशय चांगला असतो. आता कांदा केसांना कसा लावायचा असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर कांद्याचे तेल केसांच्या अनेक समस्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरु शकते. केस वाढण्याबरोबरच केसगळती कमी होण्यासाठी तसेच केस मजबूत होण्यासाठी (Hair Care Tips) आणि केसांची शाईन टिकण्यासाठी कांद्याच्या तेलाचा उपयोग होतो. पाहूयात कांद्याच्या तेलाचे प्रकार आणि वेगवेगळ्या कंपनीच्या तेलांची किंमत...
१. पॅराशूट अॅडव्हान्स ओनियन हेअर ऑईल (Parachute Advanced Onion Hair Oil )
या तेलामुळे केस वाढण्यास मदत होतेच पण केसगळतीही कमी होते. कांदा आणि नारळ या दोन अतिशय उपयुक्त अशा घटकांपासून हे तेल तयार केले जाते. यामुळे केस लांबसडक, घनदाट आणि मजबूत होण्यास उपयोग होतो. कांद्याच्या वापरामुळे तुमच्या केसांचे सामान्य खोबरेल तेलापेक्षा १० पट अधिक कंडिशनिंग होते. या तेलाची २०० मिलीग्रॅमची बाटली अॅमेझॉनवर ४० टक्के सवलतीत २३९ रुपयांना आहे.
२. वॉव स्कीन सायन्स ओनियन हेअर ऑईल (WOW Skin Science Onion Hair Oil )एरंडेल, बदाम, जोजोबा, ऑलिव्ह, कांद्याच्या बिया यांपासून तयार केलेले हे तेल केसांच्या विविध समस्यांवर फायदेशीर ठरते. केसांची वाढ होण्याबरोबरच केसांची चमक टिकून राहावी यासाठी या तेलाचा फायदा होतो. साधारणपणे तेल लावल्यावर केस चिपचिपित होतात. पण या तेलामुळे केस चिकट न होता आहेत तसेच राहतात. त्यामुळे हे तेल लावणे सोयीचे होते. केसांची मूळे पक्की होण्यासाठीही या तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो. ३८७ रुपयांना २०० मिलीग्रॅम तेल मिळत असल्याने महाग असले तरी केसांसाठी हे तेल अतिशय उपयुक्त ठरते.
३. ममाअर्थ ओनियन हेअर ऑईल (Mamaearth Onion Hair oil)या तेलात कांद्याबरोबरच सूर्यफूल, आवळा, भृंगराज असे अनेक घटक एकत्र केलेले असल्याने केसांच्या वाढीसोबतच केसांची मूळे पक्की होण्यासाठीही या तेलाचा अतिशय चांगला उपयोग होतो. यात असलेल्या बदामाच्या कंटेंटमुळे केसांची मुळे पक्की होण्यास मदत होते आणि केस मजबूत होतात. या तेलाची १५० मिलीग्रॅमची बाटली ३६६ रुपयांना मिळते.