Join us  

Hair Care Tips : कुरळे केस दिसतात सुंदर, पण कुरळे आणि कोरडे असतील तर चुकूनही करू नका 4 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 12:21 PM

Hair Care Tips : केसांचा रफनेस कमी करुन ते जास्तीत जास्त सिल्की, शायनी राहावेत यासाठी आपण आवर्जून काही गोष्टी करायला हव्यात.

ठळक मुद्देजुना टिशर्ट,सुती कपडा यांने केस हलके पुसल्यास त्यातले पाणी टिपण्यास मदत होते. केसांना जास्त तेल लावल्यास आपण ते तेल काढण्यासाठी दोन ते तीन वेळा शाम्पू वापरतो. त्यामुळे केस जास्त कोरडे होतात

आपले केस खूप कुरळे आणि कोरडे असले की ते कितीही वेळा विंचरले तरी न विंचरल्यासारखेच दिसतात. त्यांचा व्हॉल्यूम इतका जास्त असतो की केस पातळ असूनही ते खूप जाड आहेत असे पाहणाऱ्यांना वाटते. अशा कोरड्या आणि कुरळ्या केसांची काळजी घेणे हा एक मोठा टास्क असतो (Hair Care Tips). केसांचा रफनेस कमी करुन ते जास्तीत जास्त सिल्की, शायनी राहावेत यासाठी आपण आवर्जून काही गोष्टी करायला हव्यात. ज्यामुळे आपल्या केसांचा पोत चांगला राहण्यास मदत होईल. पाहूयात कोरड्या आणि कुरळ्या केसांची काळजी कशापद्धतीने घ्यायला हवी. 

(Image : Google)

१. शाम्पू करताना 

ज्या शाम्पूमध्ये सल्फेट हा घटक आहे असा शाम्पू कोरड्या केसांसाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळे केस आहेत त्यापेक्षा आणखी कोरडे होतात. केसांमध्ये बसलेली घाण, तेल आणि चिकटपणा घालवण्यासाठी आपण शाम्पू करतो. पण कुरळे आणि कोरडे केस धुताना केसांपेक्षा केसांच्या मूळांना शाम्पू लावणे आणि मुळे साफ करणे जास्त महत्त्वाचे असते. कारण केसांना शाम्पू लावला तर केस आहेत त्यापेा जास्त कोरडे होतील. केसांना शाम्पू केल्यानंतर न विसरता कंडीशनर लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे केसांची शाईन टिकून राहण्यास मदत होते. 

२. कंडीशनर वापरताना 

कुरळ्या आणि कोरड्या केसांना जास्त प्रमाणात कंडीशनिंग कऱणे आवश्यक असते. यासाठी केस धुवून झाल्यानंतर केसांच्या मूळांना नाही तर केसांना डीप कंडिशनिंग करण्याची गरज असते. त्यामुळे केसांना जास्त कंडीशनर लावा, ज्यामुळे ते सॉफ्ट राहण्यास मदत होईल. अनेकदा आपण कंडिशनिंगनंतर केसांना सिरम लावतो. पण कुरळ्या केसांना फक्त कंडिशनर पुरत नाही तर त्यांना जास्त हायड्रेशनची गरज असल्याने सिरममध्ये फ्रिझ कंट्रोल क्रिम घातल्यास त्यामुळे केस जास्त चांगले राहण्यास मदत होते. 

३. तेल लावताना 

डोक्यावरील कोरडी त्वचा आणि कोरडे केस यांच्यासाठी कोमट तेलाचा मसाज हा उत्तम उपाय आहे. केस धुण्याच्या केवळ ३० मिनीटे आधी केसांच्या मूळांना तेलाने मसाज करावा. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यासही मदत होईल. कोरड्या केसांना जास्त तेल लावले तर ते आहेत त्यापेक्षा जास्त कोरडे होण्याची शक्यता असते, म्हणून त्यांना योग्य प्रमाणातच तेल लावायला हवे. केसांच्या मूळांना जास्त तेल लावणे ठिक आहे, पण केसांना जास्त तेल लावल्यास आपण ते तेल काढण्यासाठी दोन ते तीन वेळा शाम्पू वापरतो. त्यामुळे केस जास्त कोरडे होण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

४. केस विंचरण्याबाबत

ओले केस विंचरणे केसांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कुरळ्या केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश वापरणे घातक ठरु शकते. त्यामुळे या केसांसाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरणे केव्हाही फायद्याचे ठरते. कुरळे केस ब्लो ड्राय करताना विशेष काळजी घ्यायला हवी. कारण यातील उष्णतेमुळे केसांत तुंता होण्याची शक्यता जास्त असते. कुरळे आणि कोरडे केस नैसर्गिकपणे वाळल्यावर जास्त छान दिसतात त्यामुळे त्यांना तसेच वाळू द्यायला हवे. जास्त जाड किंवा खरखरीत टॉवेलने केस पुरणे टाळावे, त्याऐवजी जुना टिशर्ट,सुती कपडा यांने केस हलके पुसल्यास त्यातले पाणी टिपण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी