Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips : केस मजबूत, मुलायम होण्यासाठी ५ मिनीटांत करा झटपट हेअरमास्क, महिन्याभरात दिसेल फरक

Hair Care Tips : केस मजबूत, मुलायम होण्यासाठी ५ मिनीटांत करा झटपट हेअरमास्क, महिन्याभरात दिसेल फरक

Hair Care Tips : अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ५ मिनीटांत तुम्ही हा मास्क तयार करु शकता. पाहूया हा हेअरमास्क कसा तयार करायचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 12:42 PM2022-04-03T12:42:34+5:302022-04-03T12:48:08+5:30

Hair Care Tips : अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ५ मिनीटांत तुम्ही हा मास्क तयार करु शकता. पाहूया हा हेअरमास्क कसा तयार करायचा...

Hair Care Tips: Install Hair Mask In 5 Minutes To Strengthen Hair | Hair Care Tips : केस मजबूत, मुलायम होण्यासाठी ५ मिनीटांत करा झटपट हेअरमास्क, महिन्याभरात दिसेल फरक

Hair Care Tips : केस मजबूत, मुलायम होण्यासाठी ५ मिनीटांत करा झटपट हेअरमास्क, महिन्याभरात दिसेल फरक

Highlightsयातील सर्व घटक नैसर्गिक असल्याने केस मुलायम होण्यासही मदत होते.आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास तुम्हाला अवघ्या महिन्याभरात फरक दिसून येईल.

केस हे महिलांच्या सौंदर्यातील महत्त्वाची गोष्ट असते. केस लांबसडक आणि मुलायम असतील तर आपल्या सौंदर्यात निश्चितच भर पडते. पण आपल्यापैकी प्रत्येकीला केसांशी निगडित काही ना काही अडचणी असतातच (Hair Care Tips). कधी केस खूप गळतात तर कधी पांढरे होतात. कधी कोरडे होतात तर कधी केसांत खूप कोंडा होतो. या सगळ्या समस्यांसाठी सतत काय उपाय करायचे असा आपल्याला प्रश्न पडतो. बरेचदा तेल, शाम्पू अशा उत्पादनांमध्ये बदल करुनही हवे तसे परिणाम दिसत नाहीत. मग पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. यामध्ये वापरली जाणारी उत्पादने आपल्या केसांना सूट होतीलच असे नाही. त्यामुळे तात्पुरते केस चांगले दिसले तरी कालांतराने त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. इतकेच नाही तर पार्लरमधल्या ट्रिटमेंट म्हटल्या की त्यावर हजारो रुपये खर्च होतात. 

अशावेळी घरच्या घरी आपण एखादा हेअरमास्क तयार केला तर? आता हेअरमास्क म्हणजे काहीतरी रॉकेट सायन्स असे आपल्याला वाटू शकते. पण सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तयार होणारा हा हेअरमास्क तयार करणे अगदी सोपे असते. महिन्यातून ठराविक वेळआ हा मास्क केसांच्या मूळांशी आणि केसांना लावल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच नैसर्गिक घटक असल्याने केसांची हानी तर होणार नाहीच आणि कमीत कमी खर्चात तुमचे केस मजबूत आणि मुलायम होतील. इन्स्टाग्रामवरील ब्यूटी एक्सपर्ट या पेजवर नुकत्याच या हेअरमास्कविषयीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ५ मिनीटांत तुम्ही हा मास्क (Homemade Hair mask) तयार करु शकता. पाहूया हा हेअरमास्क कसा तयार करायचा...

साहित्य -

१. कोरफडीचा गर - अर्धी वाटी 
२. एरंडेल तेल - १ चमचा
३. बदाम तेल - १ चमचा 
४. खोबरेल तेल - १ चमचा 
५. व्हिटॅमिन इ कॅप्सूल  - १ 

कृती -

१. हे सगळे मिश्रण एकजीव करुन केसांच्या मूळांशी आणि केसांना लावा.

२. किमान अर्धा ते १ तास हा मास्क केसांवर तसाच राहू द्या. जितका जास्त वेळ ठेवाल तितके त्याचे परिणाम जास्त चांगले होतील.

३. यामुळे केस मजबूत होतात, गळण्याचे कमी होते तसेच कोंड्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच यातील सर्व घटक नैसर्गिक असल्याने केस मुलायम होण्यासही मदत होते.

४. काही वेळाने केस पाण्याने आणि नंतर हलक्या शाम्पूने कोमट पाण्याने धुवा.

५. आठवड्यातून एकदा हा प्रयोग केल्यास तुम्हाला अवघ्या महिन्याभरात फरक दिसून येईल.

Web Title: Hair Care Tips: Install Hair Mask In 5 Minutes To Strengthen Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.