Lokmat Sakhi >Beauty > केस सतत पांढरे होतात? जावेद हबीबच्या खास टिप्स; कायम काळेभोर, शायनी राहतील केस

केस सतत पांढरे होतात? जावेद हबीबच्या खास टिप्स; कायम काळेभोर, शायनी राहतील केस

Hair Care Tips : हेअर कलर करताना वेळीच सावधगिरी बाळगली नाही तर केस डॅमेज होण्याचाही धोका असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:35 AM2023-09-06T11:35:00+5:302023-09-06T14:37:09+5:30

Hair Care Tips : हेअर कलर करताना वेळीच सावधगिरी बाळगली नाही तर केस डॅमेज होण्याचाही धोका असतो.

Hair Care Tips : Javed Habib's special tips for those who do hair dye and color at home | केस सतत पांढरे होतात? जावेद हबीबच्या खास टिप्स; कायम काळेभोर, शायनी राहतील केस

केस सतत पांढरे होतात? जावेद हबीबच्या खास टिप्स; कायम काळेभोर, शायनी राहतील केस

एकदा केस पांढरे व्हायला लागले की वारंवार कलर करूनही ते थोड्या दिवसांनी पुन्हा पिकतात.  काहीजण घरीच केसांना हेअर कलर किंवा डाय करतात तर काहीजण दर १५ दिवसांनी पार्लरमध्ये जाऊन केसांवर खर्च करतात. पार्लरला जायला वेळ न मिळाल्यास बरेचजण घरी वेगवेगळ्या ब्रॅण्डसचे रंग आणून हेअर कलर करतात. (Jawed Habib Hair care tips after colouring) हेअर कलर करताना वेळीच सावधगिरी बाळगली नाही तर केस डॅमेज होण्याचाही धोका असतो.

व्यवस्थित प्रोसेस फॉलो न केल्यास केसांवर व्यवस्थित रंग येत नाही. हेअर कलरशी निगडीत चुकांबाबत हेअर एक्सपर्ट जावेद  हबीब यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही केस खराब होण्यापासून रोखू शकता. (Javed Habib's special tips for those who do hair dye and color at home)

हेअर कलर करण्याच्या २ दिवस आधी केस शॅम्पूने व्यवस्थित धुवा. शॅम्पूने केस धुण्याच्या एक रात्र आधी केसांवर गरम तेलाने मसाज करायला विसरू नका. रात्रभर तेल ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. केस धुण्यासाठी माईल्ड शॅम्पूचा वापर करा. अनेकांना असं वाटतं की हेअर कलर करण्याआधी  केस धुवू नयेत कारण त्यामुळे रंग व्यवस्थित येत नाही. पण असं न करता केस न विसरता धुवा.

कंगवा फिरवताच केस घरभर पसरतात? जास्वंदाचा 'हा' पॅक लावा-गळणं थांबेल, दाट होतील केस

हेअर कलरवरचे इंस्ट्रक्शन्स वाचा

तुम्ही कोणत्याही ब्रॅण्डचा हेअर कलर घेतला तरी त्यावरची बारीक प्रिंट वाचायला विसरू नका. केसांवर कितीवेळ कलर लावलेला राहू द्यायचा आहे ते वाचा. जर तुम्ही हेअर कलर जास्तवेळासाठी आपल्या केसांवर राहू दिला तर केस जास्त डार्क होऊ शकतात.  यामुळे केस पातळ आणि खराब होतात. 

मान खूप काळी पडली? फक्त ३ मिनिटांत करा बनाना फेशियल; १० रुपये खर्च- मान दिसेल स्वच्छ

हेअर कलर लावताना कंजूसी करू नका

जेव्हाही तुम्ही केसांना हेअर कलर लावत असाल तेव्हा असा विचार करा की पूर्ण केस कव्हर होतील. जर तुम्ही केसांना व्यवस्थित कव्हर केलं नाही तर केसांवर रंग व्यवस्थित बसणार नाही.  जे दिसायला खराब दिसेल. हेअर कलर व्यवस्थित लावला तर त्याचा रंग सुद्धा व्यवस्थित केसांवर येईल. 

कंडीशनर लावायला विसरू नका

केसांमध्ये हेअर कलर लावल्याने स्काल्पमधिल पोर्स ओपन होतात. ज्यामुळे केस डॅमेज आणि कोरडे होतात.  हे टाळण्यासाठी कंडीशनर लावायला विसरू नका. चांगल्या हेअर कंडिशनरमुळे केस चांगले राहतात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर्स उपलब्ध आहेत. तुम्ही आपल्या केसांच्या टाईपनुसार कंडीशनरची निवड करू शकता. ज्यामुळे तुमचे केस डॅमेज होणार नाही आणि दीर्घकाळ रंग टिकून राहील. म्हणून शॅम्पूनंतर कंडिशनर लावायला विसरू नका.

Web Title: Hair Care Tips : Javed Habib's special tips for those who do hair dye and color at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.