Join us  

९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने शाम्पू करतात, तुमचंही चुकतंय? बघा शाम्पू करण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2024 3:47 PM

Proper Method Of Applying Shampoo: बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने शाम्पू करतात. आपलंही शाम्पू करताना काही चुकत नाही ना, हे एकदा तपासून पाहा. (correct method of applying shampoo and washing scalp and hair)

ठळक मुद्देकेसांमधला कोंडा निघत नसेल तर चुकीच्या पद्धतीने केस धुणं हे त्यामागचं एक कारण असू शकतं.

शाम्पू लावून केस धुणं हे आपलं नेहमीचं काम. आता त्या नेहमीच्याच कामात आपलं काय चुकणार असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण बऱ्याचदा असंही होतं की एखादं काम आपलं नेहमीचं असलं, अगदी सोपं असलं तरी ते करताना चूक होते. केस धुण्याच्या बाबतीतही तसंच होत आहे, असं डॉक्टर सांगतात (proper method of applying shampoo). जर डोक्यातून कुबट वास येत असेल (how to wash hair), केसांमधला कोंडा निघत नसेल तर चुकीच्या पद्धतीने केस धुणं हे त्यामागचं एक कारण असू शकतं. (correct method of applying shampoo and washing scalp and hair)

केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

 

योग्य पद्धतीने शाम्पू कसा करावा, याविषयीचा व्हिडिओ dr.bindusthalekar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. बहुतांश लोक दोन पद्धतीने केस धुतात. पहिली पद्धत म्हणजे काही जण हातावर शाम्पू घेतात.

सारखं आजारी पडता? सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय

दोन्ही हात एकमेकांवर चोळतात आणि मग हातांवरचा फेस केसांना लावून शाम्पू करतात. दुसरी पद्धत म्हणजे मगमध्ये पाणी घ्यायचं. त्यात शाम्पू टाकायचा आणि पाण्याचा फेस तयार करायचा आणि मग त्या पाण्याने केस धुवायचे. पण डॉक्टर सांगतात त्यानुसार शाम्पू करण्याच्या या दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. त्यामुळे आता डॉक्टरांनी सांगितलेली शाम्पू करण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहा.

 

शाम्पू कसा करावा?

डॉक्टर सांगत आहेत की सगळ्यात आधी केस आणि स्काल्प व्यवस्थित ओले करून घ्या. यानंतर तुमच्या एका हातावर शाम्पू घ्या आणि दुसऱ्या हाताची बोटे त्या शाम्पूमध्ये बुडवून व डोक्याच्या त्वचेला हळूवारपणे चोळा.

दरवर्षी नवा माठ कशाला? जुन्या माठातलं पाणीही होईल फ्रिजसारखं थंडगार- बघा आजीने सांगितलेला उपाय

असं करत डोक्याच्या त्वचेला म्हणजेच स्काल्पला शाम्पू लावावा, हळूवार हाताने डोकं चोळावं आणि त्यानंतर भरपूर पाण्याने शाम्पू धुवून टाकावा. असं केल्यास केसांतला कोंडा कमी होण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय डोक्यातून येणारी दुर्गंधीही जाईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी