Join us  

शहनाज हुसैन सांगतात, उन्हाळ्यात केसांची निगा कशी राखायची? ५ टिप्स, उन्हाळ्यात कापू नका केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 2:16 PM

Hair Care Tips: Shahnaz Husain Has The Right Remedies For This Summer : उन्हाळ्यात केसांचे मोठे हाल, घाम येतो, केस मोकळे सोडता येत नाहीत, अशावेळी काय करावे?

आपले केस घनदाट, चमकदार, लांब असावेत असे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. स्त्रिया मुख्यतः आपले केस व त्वचेची खूपच काळजी घेताना दिसतात. बदलत्या ऋतुमानानुसार आपण आपल्या केसांची व त्वचेची निगा राखण्यात बदल करतो. इतर ऋतूंपेक्षा प्रामुख्याने उन्हाळ्यांत आपल्याला केसांची व त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसांत हानिकारक यूव्ही किरणांचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवर होत असतो. कडक ऊन, उन्हाच्या तडाख्याने येणारा घाम, हवेतील धूळ, वातावरणातील गरम तापमान या सगळ्या गोष्टींचा आपल्या एकूणच आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो. केस गळणे, केस तुटणे, केस कमजोर होणे यांसारख्या समस्यांचा उन्हाळ्यांत सामना करावा लागतो.

उन्हाळ्यात आपले केस कोरडे व निर्जीव होतात. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होते. म्हणून उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णतेमुळे केसांमध्ये घाण आणि घाम जमा होत असतो. त्यासाठी नियमितपणे केसांना स्वच्छ करुन केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यांत टू व्हीलरवरून दररोज प्रवास करणाऱ्या महिलांनी तर केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सुप्रसिद्ध ब्यूटी आणि हेयर केयर एक्सपर्ट 'शहनाज हुसेन' यांनी उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही टीप्स दिल्या आहेत. या उन्हाळ्यात शहनाज हुसेन' यांनी सांगितलेल्या टीप्स लक्षात ठेवून केसांची योग्य पद्धतीने निगा राखू शकतो(Hair Care Tips: Shahnaz Husain Has The Right Remedies For This Summer).    

उन्हाळ्यांत केसांची काळजी कशी घ्यावी? 

१. केसांना तेल जरुर लावा :- उन्हाळ्यांत केसांना तेल लावल्याने केस खूपच चिपचिपे होतात, भरपूर घाम येतो. यांसारख्या विविध कारणांमुळे आपण उन्हाळ्यांत केसांना तेल लावणे टाळतो. परंतु असे न करता उन्हाळ्यांत देखील केसांना तेल लावणे गरजेचे असते. केसांच्या मुळांना व खालच्या टोकाला तेलाने मालिश करणे गरजेचे असते. केसांना आदल्या रात्री तेलाने मालिश करून दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवून टाकावेत. केस धुताना एखाद्या माईल्ड शॅम्पूचा वापर करावा. जर आपण देखील उन्हाळ्यांत केसांना तेल लावणे टाळत असाल तर तसे करु नका. उन्हाळ्यांत देखील केसांना तेल लावणे गरजेचे असते. 

२. हेअर सिरमचा वापर :- केस धुतल्यानंतर, केस व्यवस्थित सेट होण्यासाठी त्यांना सिरम लावणे गरजेचे आहे. केस धुतल्यानंतर, हेअर सिरम किंवा लाईव्ह कंडिशनरचा अवश्य वापर करावा. उन्हाळ्यांत हेअर सिरम किंवा लाईव्ह कंडिशनर केसांना लावताना ते जास्त प्रमाणात लावू नयेत. हेअर सिरम किंवा लाईव्ह कंडिशनर थोडेसेच हातावर घेऊन त्याने हलकेच केसांना मालिश करावे. क्लोरीनमुळे केसांचे नुकसान होऊ नये यासाठी केस धुण्याआधी केसांना सिरम लावावे.  

     

३. तेलकट केसांची उन्हाळ्यांत अशी घ्या काळजी :- उन्हाळ्यांत तेलकट किंवा ऑयली केसांची अधिक जास्त काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यांत वारंवार येणाऱ्या अत्याधिक घामामुळे केस खराब होण्याची जास्त शक्यता असते. आपल्याला येणाऱ्या घामामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. घामामध्ये असणाऱ्या मिठाच्या जास्त प्रमाणामुळेच आपले केस फार रुक्ष होऊ शकतात. उन्हाळ्यांत असणाऱ्या वातावरणातील उष्णतेमुळे केसांची नैसर्गिक चमक नाहीशी होते.  वातावरणातील उष्णतेमुळे व गरम्याने उन्हाळ्यांत ऑयली केस अधिक जास्त प्रमाणांत तेलकट होतात. अशावेळी हे तेलकट केस आपल्याला रोज धुवून स्वच्छ करावेसे वाटत. जर आपले केस ऑयली आहेत, आणि उन्हाळ्यांत गरम्याने ते अधिकच जास्त ऑयली होत असतील तर रोज केस स्वच्छ धुणे हा एक सोपा पर्याय आहे. असे करताना आपण दररोज शॅम्पूचा वापर करणार असाल तर माईल्ड किंवा हर्बल शॅम्पचा पर्याय निवडावा. कारण केमिकल्स मिश्रित शॅम्पूचा  रोज वापर केल्यास आपल्याला केसांसंबधीत इतर समस्या उद्भवू शकतात.  

४. नैसर्गिक कंडिशनरचा वापर :- जर आपले केस खूपच ऑयली असतील तर हेव्ही कंडिशनर लावणे शक्यतो टाळावे. केस धुतल्यानंतर केसांना नैसर्गिक पद्धतीने कंडिशनिंग करावे. ऊन्हाळ्यात ऑयली केसांसाठी वापरलेल्या चहापावडरचे पाणी आणि लिंबाचा रस हे उत्तम नैसर्गिक कंडिशनर आहेत. चहासाठी वापरलेली चहापावडर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात उकळवून घ्यावी. हे मिश्रण थंड झाल्यावर धुतलेल्या केसांवर यांचा कंडिशनर म्हणून वापर करावा. याचबरोबर लिंबाच्या रसाचा आपण नैसर्गिक कंडिशनर म्हणून देखील वापर करु शकता. 

५. हे पण नक्की लक्षात ठेवा :- रुक्ष आणि रखरखीत झालेल्या केसांमध्ये भरपूर स्प्लिट एंड्स होतात. यासाठी स्प्लिट एंड्स होऊ नयेत म्हणून केसांना वेळोवेळी  योग्य पद्धतीने ट्रिम करावे. उन्हाळ्यांत केसांची योग्य आणि नियमित देखभाल करणे अतिशय गरजेचे आहे. केसांना रबर बँडने खूप जास्त गच्च पिळ बसेल असे बांधू नका. हेअर ड्रायर आणि केस विंचरण्यासाठी ब्रशचा वापर कमीत कमी प्रमाणांत करावा. केसांचा गुंता होऊ नये म्हणून मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करावा.

टॅग्स :केसांची काळजी