Join us  

तुम्हीही मागून केस विंचरता? ४ तोटे, केसांचा पोत कायम चांगला ठेवायचा तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 5:31 PM

hair care tips side effects of back combing hair : केस विंचरताना काही गोष्टींचे भान ठेवायलाच हवे...

केस विंचरणे हे आपल्या आवरण्याच्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत विशेषत: महिला सतत केस विंचरतात.  बाहेर जाताना तर आपण चांगले दिसावे म्हणून एखादी हेअरस्टाइल करतो किंवा केस सेट करतो. ऑफीसमध्ये जायच्या आधीही काही मिनीटे आपण ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये नाहीतर वॉशरुममध्ये जाऊन केस विंचरतो. केस नीट विंचरलेले असतील तर ते चांगले दिसतात. त्यामुळेच अनेकांना सतत केसांतून कंगवा फिरवण्याची सवय असते. केस विंचरल्यावर चांगले दिसतात हे जरी खरे असले तरी सतत विंचरल्याने केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. आपण केस मागच्या बाजुने विंचरतो केस सतत धुणे, विंचरणे यांसारख्या गोष्टींमुळे केसांचे नुकसान होऊ शकते. ते कसे आणि कोणते समजून घेऊया (hair care tips side effects of back combing hair)...

१. केस तुटतात

केस मागच्या बाजुने विंचरले की ते तुटण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा आपण मागच्या दिशेने केस विंचरतो तेव्हा त्यांच्यावर कंगव्याने प्रेशर दिले जाते आणि ते तुटण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा आपण घाईघाईत मागच्या दिशेने केस विंचरतो तेव्हा तर ते जास्त प्रमाणात तुटतात. केस तुटल्याने आणि गळाल्याने ते पातळ तर होतातच पण त्यांना फाटे फुटण्याची समस्याही वाढते. 

(Image : Google)

२. केसांत गुंता होतो

केसांत गुंता होणे ही एक मोठी समस्या आहे. कारण एकदा गुंता झाला की तो लवकर निघत नाही आणि मग तो काढताना आपल्या नाकात दम येतो. मागच्या बाजुने केस विंचरल्यास केसांत खूप जास्त गुंता होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे केस नीट करण्यास वेळ तर लागतोच पण केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. 

३. केसांच्या मुळांशी आग होणे 

केस मागच्या बाजुने विंचरताना आपल्याकडून केसांच्या मुळांपासून केस जोरजोरात विंचरले जातात. केसांवरुन सारखा कंगवा फिरवल्याने केसांच्या मूळाशी आग होण्याची शक्यता असते. 

(Image : Google)

४. केस खराब होतात

केस मागच्या बाजुने विंचरल्याने ते खराब होण्याची शक्यता असते. सतत केस विंचरल्याने केसांच्या क्यूटीकल्स आणि शाफ्टना नुकसान पोहोचते. यामुळे केस कमजोर होण्याची आणि तुटण्याची, फाटे फुटण्याचीही शक्यता असते.        

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी