Join us  

Hair Care Tips : सिल्की - शायनी - सुळसुळीत केस हवेत? घरच्याघरी बनवा झटपट मस्त हेअरमास्क....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 6:31 PM

Hair Care Tips : इन्स्टाग्रामवर ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम पेजवर याविषयीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही हे हेअरमास्क तयार करु शकता.

ठळक मुद्देतुमचेही केस असेच शायनी आणि सिल्की असावेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे हेअर मास्क नक्की ट्राय करु शकता. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही हे हेअरमास्क तयार करु शकता.

कधी वेगवेगळी रासायनिक उत्पादने वापरल्याने तर कधी आहारातून पुरेसे पोषण न झाल्याने आपले केस खूप रुक्ष आणि कोरडे व्हायला लागतात. जाहिरातीत किंवा टिव्हीवर दिसणाऱ्या अभिनेत्रींचे केस इतके सुंदर आणि सुळसुळीत असतात मग आपले का नाही असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. पण आपण केसांची म्हणावी तितकी नीट काळजी घेत नाही (Tips for silky and shiny hairs). केसांना नियमित तेलाने मसाज करणे, शाम्पू आणि कंडीशनरनी ते धुणे याच्या पलिकडे आपण केसांची फारशी काळजी घेत नाही (Hair Care Tips). शरीराचे पोषण होण्यासाठी ज्याप्रमाणे शरीराला संतुलित आहाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे केसांचे पोषण होण्यासाठी केसांना चांगले वातावरण, कंडिशनिंग (Hair Mask) अशा विविध गोष्टींची आवश्यकता असते. 

(Image : Google)

वातावरणातील प्रदूषण, आनुवंशिकता किंवा इतर काही कारणांनी केस कोरडे होण्याची किंवा खराब होण्याची समस्या उद्भवते. असे खराब किंवा रुक्ष झालेले केस शायनी आणि सुळसुळीत करायचे असतील तर पाहूयात घरच्या घरी सोपा हेअर मास्क कसा तयार करायचा. इन्स्टाग्रामवर ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम पेजवर याविषयीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून तुम्ही हे हेअरमास्क तयार करु शकता.

यासाठी तुम्हाला २ चमचे शिजलेला भात, दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्सरमधून बारीक करुन घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये १ वाटी नारळाचे दूध एकत्र करा. नारळाचे दूध तुम्ही घरात काढू शकता किंवा हल्ली विकतही हे दूध सहज उपलब्ध होते. हे मिश्रण केसांना सगळ्या केसांना एकसारखे लावायचे. केस वरच्या बाजुला बांधून ठेवून १ तासाने हलक्या शाम्पूने केस धुवून टाकायचे. त्यानंतर तुमचे केस एकदम सिल्की आणि शायनी होतील. भारत, ऑलिव्ह ऑईल आणि नारळाचे दूध हे तीनही पदार्थ केसांना पोषक असल्याने केसांचा पोत सुधारण्यास याची चांगली मदत होते. त्यामुळे तुमचेही केस असेच शायनी आणि सिल्की असावेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे हेअर मास्क नक्की ट्राय करु शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी