आहारातून पुरेसं पोषण मिळालं नाही, की मग केसांचं आरोग्यही बिघडू लागतं. त्यातच केसांवर सातत्याने धुळ, प्रदुषण, कॉस्मेटिक्सच्या निमित्ताने वेगवेगळे केमिकल्स यांचा मारा होतच असतो. आधीच अपुरे पोषण आणि त्यात हा एवढा त्रास सहन करावा लागत असल्याने केस दिवसेंदिवस खूपच कमजोर होऊ लागतात. केसांची वाढ (hair growth) तर खुंटतेच पण गळण्याचं प्रमाणही वाढू लागतं. म्हणूनच तर केसांना योग्य पोषण देण्यासाठी घरच्याघरी करून बघा हा एक सोपा उपाय. (home remedies to controll hair fall)
केसांचं आरोग्य सुधारायचं असेल तर तुमच्या स्वयंपाक घरातला एक पदार्थ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. तो पदार्थ म्हणजे जवस. केसांचे पोषण करण्याची पुरेपूर क्षमता जवस म्हणजेच Flaxseeds मध्ये आहे. पण त्याचा कसा वापर करून घ्यायचा, याची एक खास पद्धत आहे. याविषयीची माहिती इन्स्टाग्रामच्याhairfall__solutions या पेजवर शेअर करण्यात आली आहे. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. महिनाभर नियमितपणे केल्यास नक्कीच चांगला फरक दिसून येईल. केसांचं गळणं कमी होऊन ते दाट आणि मजबूत होतील, असं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
केसांसाठी तयार करा जवसाचं जेल (how to make flax seed gel?)- यासाठी सगळ्यात आधी तीन कप पाणी एका भांड्यात टाका आणि उकळत ठेवा.- त्यात एक मुठ भरून जवस टाका.- पाणी आणि जवस एकत्रितपणे चांगले उकळू द्या.- यानंतर हळूहळू जवसाचा चिकटपणा पाण्यात उतरेल आणि पाणी घट्ट होत असल्याचे जाणवेल.- यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. थंड झाले की एखाद्या कापडातून गाळून घ्या.- जवसाचे सेमी सॉलिड जेल तयार झालेले असेल.- हे तेल केसांच्या मुळाशी आणि केसांच्या लांबीवर लावा.- अर्धा पाऊण तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
केसांसाठी जवसाचा उपयोग (Flax Seed For Hair)- जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्याने ते केसांसाठी फायद्याचे ठरते.- जवसामध्ये असलेले तेल केसांचे पोषण करते.- केसांत वारंवार कोंडा होत असेल तरी जवसाचा लेप किंवा जेल उपयुक्त ठरतो.- जवसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते.