Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips : केस पातळ झालेत, खूप गळतात? केस दाट होण्यासाठी ३ सोपे उपाय

Hair Care Tips : केस पातळ झालेत, खूप गळतात? केस दाट होण्यासाठी ३ सोपे उपाय

Hair Care Tips : आपण ज्या उशीवर झोपतो त्याठिकाणीही केसांचा पुंजका पडतो. डोक्यात हात घातला की केसांचा गुंता बाहेर येतो. असे होत असेल तर मात्र केसांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 03:01 PM2022-03-14T15:01:02+5:302022-03-14T15:30:58+5:30

Hair Care Tips : आपण ज्या उशीवर झोपतो त्याठिकाणीही केसांचा पुंजका पडतो. डोक्यात हात घातला की केसांचा गुंता बाहेर येतो. असे होत असेल तर मात्र केसांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे.

Hair Care Tips: Thinning hair, shedding too much? 3 easy ways to thicken hair | Hair Care Tips : केस पातळ झालेत, खूप गळतात? केस दाट होण्यासाठी ३ सोपे उपाय

Hair Care Tips : केस पातळ झालेत, खूप गळतात? केस दाट होण्यासाठी ३ सोपे उपाय

Highlights३० मिनीटे केसांना भृंगराज तेलाने मसाज करुन तासाभराने किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी केस हलक्या शाम्पूने धुवावेत.. भारतीय घरांमध्ये आवळा आणि शिकेकाई केसांसाठी पूर्वीपासून वापरतात. केसांची मुळे पक्की व्हावीत यासाठी शिकेकाई उपयुक्त ठरते

आपले केस घनटाद आणि लांबसडक असावेत असे प्रत्येकीला वाटते. पण सतत काही ना काही कारणाने केस गळत असल्याची तक्रार आपल्यातील अनेक जणी करताना दिसतात. नियमित केस विंचरताना केस गळणे अगदी सामान्य आहे. पण अनेकदा केस इतके पातळ होतात की डोक्याचा भाग दिसायला लागतो. इतकेच नाही तर केस गळतीचे प्रमाण इतके जास्त वाढते की आपण ज्या उशीवर झोपतो त्याठिकाणीही केसांचा पुंजका पडतो. डोक्यात हात घातला की केसांचा गुंता बाहेर येतो. असे होत असेल तर मात्र केसांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे (Hair Care Tips). आता इतक्या मोठ्या प्रमाणात केसगळती नेमकी कशामुळे होते असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो तर केसगळती होण्याची अनेक कारणे आहेत. इतकेच नाही तर तुम्हालाही या केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तसे होऊ नये यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी य़ोगेंद्र सांगतात काही महत्त्वाचे उपाय...

(Image : Google)
(Image : Google)

केस गळण्याची कारणे 

१. अयोग्य आहार
२. अपुरे पोषण
३. प्रदूषण
४. आनुवंशिकता 
५. औषधोपचार 
६. ताणतणाव

केस गळणे कमी व्हावे यासाठी काय कराल

१. केळं आणि अॅव्हाकॅडो नासर्गिक हेअरपॅक

हेअरपॅक हा अनेकदा आपल्या केसांचे पोषण होण्यासाठी उपयुक्त असतो. पण आपण बाजारात सहज उपलब्ध होणारे केमिकल्स असलेले हेअरपॅक वापरतो. इतकेच नाही तर आपण केसांच्या अनेक तक्रारींवर पार्लरमधील महागडे उपचार करतो. पण या केमिकल्समुळे केसांचा पोत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे घरच्या घरी तयार केलेले होममेड हेअरपॅक वापरणे केव्हाही चांगले. केळं आणि अॅव्हाकॅडोपासून तयार केलेला हेअरपॅक केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगला असतो. या हेअरपॅकमुळे केसांच्या फोलिकलचे पोषण होते आणि केसगळती कमी होण्यास मदत होते. अव्हाकॅडो आणि केळ्याचा गर एकत्र करा. त्यामध्ये १ चमचा ऑलिव्ह ऑईल घालावे आणि ही ेपस्ट केसांच्या मूळांशी आणि संपूर्ण केसांनाही लावावी. यामुळे केसगळती कमी होऊन नव्याने केस येण्यास मदत होते. ३० ते ४० मिनीटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाकावेत. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस धुवावेत. 

२. आवळा आणि शिकेकाई हेअरपॅक

आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते हे आपल्याला माहित आहे. तसेच त्यामध्ये अँटीऑक्सिडंटस आणि फ्लेवोनाईडस हे गुणधर्मही असतात.यामुळे केसगळती तर कमी होईलच पण केसांचा दाटपणा वाढण्यास मदत होईल. भारतीय घरांमध्ये आवळा आणि शिकेकाई केसांसाठी पूर्वीपासून वापरतात. केसांची मुळे पक्की व्हावीत यासाठी शिकेकाई उपयुक्त ठरते, तर केसांचे पोषण होण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त असते. एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा शिकेकाई पावडर एका पॅनमध्ये घ्या. त्यात एक चमचा खोबरेल तेल घालून मध्यम आचेवर हे गरम करा. हे गरम केलेले मिश्रण गाळणीतून गाळून घ्या आणि गार होऊद्या. नंतर हे मिश्रण केसांच्या मूळांशी लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा तासाभराने केस कोमट पाण्याने आणि हलक्या शाम्पूने धुवून टाका. 

(Image : Google)
(Image : Google)

३. तेलाचा मसाज

तेलाने मसाज करणे ही केसांसाठी पोषण देणारी गोष्ट आहे. केसांना तेल लावणे याबाबत आयुर्वेदात बरेच सांगितलेले आहे. कोमट तेलाने केसांच्या मुळांशी केलेला मसाज केसांच्या पोषणासाठी अतिशय उपयुक्त असतो. यातही भृंगराज तेल केसांसाठी अतिशय चांगले असते. भृंगराजमध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिजांचे प्रमाण जास्त असल्याने केसांच्या फॉलिकल्सचे पोषण होते. या घटकांमुळे केस तुटणे, गळणे कमी होते. आपल्याला आलेला ताण कमी होण्यासाठीही भृंगराज तेल उपयुक्त ठरते. ३० मिनीटे केसांना भृंगराज तेलाने मसाज करुन तासाभराने किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी केस हलक्या शाम्पूने धुवावेत.
 

Web Title: Hair Care Tips: Thinning hair, shedding too much? 3 easy ways to thicken hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.