Lokmat Sakhi >Beauty > अक्रोड खाऊन टरफलं फेकून देऊ नका! पांढऱ्या केसांसाठी करा त्याचा उत्तम उपाय, केस होतील काळेभोर, घनदाट

अक्रोड खाऊन टरफलं फेकून देऊ नका! पांढऱ्या केसांसाठी करा त्याचा उत्तम उपाय, केस होतील काळेभोर, घनदाट

Best Use of Walnut shell: अक्रोड फोडून आपण आतलं खातो आणि टरफलं फेकून देतो. पण ही टरफलं तुमच्या पांढऱ्या केसांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 08:03 AM2022-09-28T08:03:37+5:302022-09-28T08:05:01+5:30

Best Use of Walnut shell: अक्रोड फोडून आपण आतलं खातो आणि टरफलं फेकून देतो. पण ही टरफलं तुमच्या पांढऱ्या केसांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

Hair Care Tips: Walnut shell powder for white hair, Home remedies for gray hair | अक्रोड खाऊन टरफलं फेकून देऊ नका! पांढऱ्या केसांसाठी करा त्याचा उत्तम उपाय, केस होतील काळेभोर, घनदाट

अक्रोड खाऊन टरफलं फेकून देऊ नका! पांढऱ्या केसांसाठी करा त्याचा उत्तम उपाय, केस होतील काळेभोर, घनदाट

Highlights थोडा संयम ठेवून नियमित उपाय केल्यास काही महिन्यांतच केस काळेभोर- दाट होतील...

कमी वयात केस पांढरे (gray hair) होण्याचे प्रमाण सध्या खूपच वाढलं आहे. एक म्हणजे केस खूप गळतात आणि दुसरं म्हणजे केस कमी वयातच पांढरे होऊ लागले आहेत. अशा दोन्ही समस्यांनी तुम्ही वैतागला असाल, तर हा एक उपाय तुमच्यासाठीच आहे. उपाय (Home remedies for gray hair) अतिशय सोपा आहे. पण अतिशय परिणामकारक आहे. त्यासाठी तुम्ही तो काही महिने मात्र नियमितपणे केला पाहिजे, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. घरगुती उपाय करून फरक नक्कीच पडतो. फक्त त्यासाठी संयम गरजेचा असतो. त्यामुळे थोडा संयम ठेवून नियमित उपाय केल्यास काही महिन्यांतच केस काळेभोर- दाट होतील, असं सांगितलं आहे.(Walnut shell powder for white hair)

 

पांढऱ्या केसांसाठी अक्रोडाचा उपयोग
१. पांढऱ्या केसांसाठी अक्रोडाच्या टरफलांचा उपयोग कसा करायचा, याविषयीही ही माहिती इन्स्टाग्रामच्या holistichealthwithpunita या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

२. हा उपाय करण्यासाठी अक्रोडाची टरफलं मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.

चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक

३. यानंतर एका पातेल्यात एक लीटर पाणी घ्या. त्यात अक्रोडाच्या टरफलाची पावडर ६ टेबलस्पून एवढी टाका.

४. साधारणपणे अर्धा तास तरी हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर ठेवून उकळू द्या. 

५. त्यानंतर गॅस बंद करा आणि पातेल्यावर झाकण ठेवून द्या.

 

कसा करायचा उपयोग?
१. आता आपण अक्रोडाची टरफलं असणारं जे पाणी तयार केलं आहे, ते गाळून घ्या. 

चॉकलेटची भजी खायची? ती ही हिरव्या तिखट चटणीसोबत!! बघा भलताच पदार्थ, व्हायरल व्हिडिओ

२. केसांच्या मुळांशी लावून हळूवार हाताने मसाज करा.

३. २ तासानंतर नेहमीप्रमाणे केस धुवून टाका.

४. चांगला परिणाम दिसून येण्यासाठी जवळपास ३ महिने तरी आठवड्यातून २ वेळा हा उपाय करावा. 

 

 

Web Title: Hair Care Tips: Walnut shell powder for white hair, Home remedies for gray hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.