Join us  

फिरायला गेल्यावर खराब केसांमुळे फोटोंची वाट लागते? प्रवासातही केस नीट ठेवायचे तर... तज्ज्ञ सांगतात ४ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 5:15 PM

Hair Care Tips While Traveling by Dr. Jayashree Sharad : प्रसिद्ध ब्यूटी स्पेशालिस्ट डॉ. जयश्री शरद काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात

ठळक मुद्देहेअर स्टायलिंग प्रॉडक्टमुळे आपल्याला प्रवासात केस मॅनेज करणे म्हणावे तितके सोपे होणार नाही.  प्रवासात आपण ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याची, त्वचेची काळजी घेतो त्याचप्रमाणे केसांचीही पुरेशी काळजी घ्यायला हवी.

कधी वन डे साठी तर कधी ८ दिवसांच्या ट्रिपसाठी आपण फिरायला जातो. अशावेळी निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच रिलॅक्स होणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटो काढून ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपडेट करणे हे एक महत्त्वाचे काम असते. फिरायला जातो म्हटल्यावर आपण कपडे, सौंदर्यप्रसाधने अगदी चपलाही प्रत्येक कपड्यावर सूट होतील अशा सोबत घेतो. आपले फोटो परफेक्ट यावेत य़ासाठी हा सगळा अट्टाहास सुरू असतो. अनेकदा आपले कपडे, मेकअप हे सगळे व्यवस्थित असले तरी केस मात्र फारच विचित्र दिसतात. कधी हे केस खूप चिकट आणि चिपचिपे होतात तर कधी इतके भुरे दिसतात की कितीही सेट केले तरी ते काही केल्या नीट बसत नाहीत (Hair Care Tips While Traveling by Dr. Jayashree Sharad). 

(Image : Google)

केस चांगले दिसत नसल्याने ना आपले फोटो चांगले येतात ना आपला लूक परफेक्ट दिसतो. अशावेळी केसांचे काय करावं हे आपल्याला कळत नाही. प्रवासात आपण ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याची, त्वचेची काळजी घेतो त्याचप्रमाणे केसांचीही पुरेशी काळजी घ्यायला हवी. आता काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे याविषयी प्रसिद्ध ब्यूटी स्पेशालिस्ट डॉ. जयश्री शरद काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरुन त्या फॉलोअर्सना नेहमीच काही ना काही ब्यूटी टिप्स देत असतात. यामध्ये केसांची काळजी, त्वचेची काळजी कशी घ्यायची याविषयी अगदी सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी त्या शेअर करतात. इन्स्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही बरीच असून त्यांच्या या टिप्सचा वापर अनेक जणी करताना दिसतात. आता प्रवासात केसांची काळजी कशी घ्यायची पाहूया...

१. तुमचा स्वत:चा शाम्पू आणि कंडीशनर कायम सोबत ठेवा. ट्रिपला गेल्यावर आपण कधीतरी हॉटेलमधला शाम्पू वापरतो. मात्र त्याने आपले केस खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे तसे करणे टाळा.

२. उन्हात जाताना डोक्याला स्कार्फ किंवा बंदाना बांधा. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांचा पोत खराब होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर तुम्ही केसांवर कलर ट्रीटमेंट केली असेल तर तेही खराब होण्याची शक्यता असल्याने उन्हात जाताना केस बांधलेले राहतील असे पाहा. 

३. केस कंगव्याने विंचरण्याआधी त्याला आठवणीने हेअर सिरम लावा. यामुळे केस तुटणार नाहीत आणि खूप भुरभुरेही होणार नाहीत.

४. शक्यतो हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट प्रवासात वापरणे टाळा. बाहेर जाताना साधी-सोपी हेअरस्टाईल करा. हेअर स्टायलिंग प्रॉडक्टमुळे आपल्याला प्रवासात केस मॅनेज करणे म्हणावे तितके सोपे होणार नाही.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी