सध्याच्या काळात अर्ध्यापेक्षा जास्त लोक केसांच्या संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. केस गळणं, वेळेआधीच केस पांढरे होणं या समस्या अनेकांना उद्भवतात. केमिकल्सयुक्त डायचा केसांवर वापर केल्यास किंवा एंटी हेअर फॉल शॅम्पूचा केसांवर वापर केल्यास स्काल्पला नुकसान पोहोचू शकते. (Hair Care Tips)
केसांना नैसर्गिकरित्या काळे बनवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. योगाचार्य़ कुलदिप त्यागी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. केसांना काळे करण्यासाठी आणि केस गळण्यापासून रोखण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता. योगगुरूंनी या उपायांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा उपयोग करावा याबाबत सांगितले आहे. ( Yoga guru Kuldeep says apply this special oil, get black hair)
योगाचार्य कुलदीप त्यागी सांगतात की तुमचे केस गळत असतील किंवा केस तुटत असतील तर घरगुती उपाय करू शकता. हे उपाय केल्यानं केस दाट होण्यास मदत होईल. काही उपायांमुळे केस जास्त रफ होतात. हे उपाय केल्यास केसांच्या गंभीर समस्या कमी होण्यास मदत होईल.
योग गुरू यांचा उपाय कोणता?
लोखंडाची कढई- १
हर्बल मेहेंदी- १०० ग्रॅम
कढीपत्ता पावडर - ५० ग्रॅम
जास्वंदाची पावडर - ५० ग्रॅम
आवळा पावडर- ५० ग्रॅम
दही- १० ग्रॅम
पाणी- १.५ ग्लास
हर्बल तेल- १ छोटी वाटी
काळे तिळ - १ चमचा
रात्री झोपण्याच्या आधी एक लोखंडाची कढई घ्या आणि त्यात हर्बल मेहेंदी, कढीपत्ता पावडर, जास्वंदाच्या फुलांची पावडर, आवळा पावडर, दही आणि पाणी घालून मिक्स करा. नंतर एका रात्रीसाठी कढईत हे साहित्य भिजवायला ठेवा. दुसऱ्या दिवशी केसांना ही मेहेंदी केसांना लावा आणि ३ तास तसंच लावून सोडा. नंतर केस धुवा यामुळे केसांचे गळणं कमी होतं आणि केस वेळेआधीच पांढरे होत नाहीत.
नवरात्र: ९ दिवस उपवास करताय तर लक्षात ठेवा ५ नियम, पित्त होऊन तब्येत बिघडणार नाही
योग गुरू कुलदीप यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की हेअर वॉश केल्यानंतर हर्बल तेलाचा वापर करा, नंतर रोज सकाळी नाश्ता केल्यानंतर १ चमचा आवळा पावडर आणि १ चमचा काळ्या तिळाचे सेवन करा. आपल्या केसांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी हा परिणामकारक उपाय आहे.