काही जणी अगदी एकेक दिवसाआड केस धुतात तर काही जणी आठवडाभर केसांना पाणीही लावत नाहीत. अशा दोन्ही बाबतींमध्ये केसांचे नुकसान होऊ शकते. वारंवार केस धुत (hair wash tips) असाल तर त्यामुळे केसांमध्ये आणि डोक्याच्या त्वचेमध्ये काेरडेपणा येऊ शकतो आणि त्यामुळे कोंडा वाढून केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. याउलट जर केस खूपच कमी धुत असाल तरी देखील केसांमध्ये घाण, मळ होऊन केसांच्या अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे केस नेमके धुवायचे कधी, हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. याशिवाय केस किती वेळा धुवावेत हे बरेचदा आपल्या डोक्याची त्वचा कशी आहे, केसांचे आरोग्य कसे आहे, यावरही अवलंबून असते. त्यामुळे इतर कुणी दर दोन दिवसाआड किंवा दर चार दिवसाआड केस धुत असेल तर तसंच आपणही करावं, असं मुळीच नाही. आपल्या केसांचं टेक्स्चर आणि आरोग्य बघा आणि त्यावरच केस कसे आणि आठवड्यातून किती वेळा धुवावेत हे ठरवा.
केस धुण्याआधी हे लक्षात घ्या..
१. जर तुमचे केस कोरडे (dry scalp) असतील, त्यांच्यात चिपचिपेपणा अजिबातच नसेल तर असे केस ४ ते ५ दिवसांतून एकदा धुवावेत. केस धुताना शाम्पूचा वापर खूपच प्रमाणात असावा..केस धुण्याआधी कोमट तेलाने मसाज करायला विसरू नका.
२. केस धुतल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी तेलकट, चिपचिपित होत असतील तर तुमचे केस तेलकट (oily hair) आहेत. असे केस दर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी धुण्यास हरकत नाही. पण शाम्पूचा वापर मात्र काळजीपुर्वक करा. केसांचं तेल निघून जावं म्हणून डोक्याच्या त्वचेवर शाम्पूचा मारा अजिबातच करू नका. यामुळे स्काल्पचं नुकसान होईल आणि केस अकाली पांढरे होणे (gray hair), डोक्यात कोंडा होणे, केस गळणे (hair fall) अशा समस्या सुरू होतील.
असे केस लगेचच धुवावेत
- डोक्यात वारंवार खाज येत आहे.
- डोक्यातला कोंडा वाढणे (dandruff)
- केसांमधून दुर्गंध
- केस खूपच चिपचिपित, चिकट, तेलकट झाले तर
- केसांत गाठी होत आहेत
- केस विंचरल्यावर ते एकाच जागी चिकटून बसत आहेत
- केसांचे वळण नीट हवे तसे घेता येत नसेल तर..