पावसाळ्याच्या दिवसांत केसांच्या तक्रारी (hair care in monsoon) जरा जास्तच वाढलेल्या असतात. या दिवसांत केसांमध्ये कोंडा होण्याचं, केस गरजेपेक्षा जास्तच ऑईली किंवा चिपचिपित (oily and freezy hair in rainy season) होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. शिवाय अशात जर पावसांत भिजणं झालं तर मग केस खूपच चिकट होतात. यालाच आपण फ्रिजी हेअर म्हणतो. त्यामुळे आधीच वातावरणामुळे जरा खराब झालेल्या केसांवर पुन्हा एकदा हार्ड केमिकल्स असणारे हेअर कलर (Hair colouring tips during monsoon) लावले, तर मग केसांचा पोत आणखीनच बिघडतो. त्यासाठीच पावसाळ्यात हेअर कलरींग करताना काही गोष्टींची जरा विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. (How to protect your hair colour in rainy season)
पावसाळ्यात हेअर कलर करताना....१. हेअर कलरची क्वालिटीबाजारात अगदी कमीत कमी किमतीपासून ते अगदी महागडे असे अनेक प्रकारचे हेअर कलर उपलब्ध असतात. त्यात ज्यांचे केस खूपच जास्त पांढरे झालेले आहेत, अशांना तर अगदी महिना- दोन महिन्यातून एकदा हेअर कलर करावाच लागतो. प्रत्येकवेळी महागडे प्रोडक्ट घेणं जिवावर येतं. त्यामुळे मग अनेक जण क्वालिटीच्या बाबतीत तडजोड करतात आणि स्वस्तातला हेअर कलर विकत घेतात. पण असं करणं टाळा. पावसाळ्यात तर नेहमी उत्तम दर्जाचाच हेअर कलर निवडायला पाहिजे. कारण कमी गुणवत्तेच्या हेअर कलरमध्ये असणारे हार्ड केमिकल्स केसांचं नुकसान करू शकतात. पावसाळ्यात आधीच केस जरा खराब झालेले असल्याने त्यांच्यावर असा प्रयोग टाळलेलाच बरा.
२. तेलाने मसाजपावसाळ्यात ड्राय स्काल्पची समस्या अनेकांना जाणवते. त्यामुळेच मग डोक्यात कोंडा होण्याचा त्रास या दिवसांत वाढलेला असतो. किंवा कोंडा नसला तरी डोक्याची त्वचा कोरडी पडल्याने डोक्यात खाज सुटते. त्यामुळे स्काल्पला पोषण मिळण्यासाठी पावसाळ्यात हेअर कलर करण्याच्या आधी एक दिवस केसांना तेल लावून मसाज करा. असे केल्याने हेअर कलर केल्यानंतर केसांमध्ये काेरडेपणा, रुक्षपणा जाणवणार नाही.
या गोष्टीही लक्षात ठेवा...- वारंवार पावसात भिजल्याने केसांवरचा रंग लवकरच डल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य तो पावसात जाणे टाळा.- जर अगदीच नाईलाज असेल तर सगळे केस गुंडाळून त्यांचा एक बन घाला आणि तो रबरबॅण्डने व्यवस्थित पॅक करा. शिवाय ओढणी किंवा स्टोल घेऊन केस झाकून घ्या. यामुळेही केसांना बऱ्यापैकी संरक्षण मिळेल.- पावसात घराबाहेर पडण्याची वेळ आलीच तर केसांवर आधी थोडंसं लिव्ह- इन- कंडिशनर leave-in hair conditioner लावा. केस व्यवस्थित बांधून घ्या आणि त्यानंतरच घराबाहेर पडा.